Elon Musk Son Death
'या' व्हायरसमुळे मी माझ्या मुलाला गमावलं ; मस्क यांचा धक्कादायक खुलासाFile Photo

Elon Musk Son Death | 'या' व्हायरसमुळे मी माझ्या मुलाला गमावलं ; मस्क यांचा धक्कादायक खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क: जगातील सर्वात श्रीमंत व्यकी आणि एक्स, स्पेस एक्स व टेस्ला सारख्या बलाढ्य कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) एलन मस्क यांनी एका मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी त्यांचा मुलगा झेविअर याला 'वोक माइंड व्हायरमुळे गमावल्याचे म्हणत तो आता मुलगी असल्याचेही स्पष्ट केले आहे.

'वोक माइंड विषाणु'मुळे मी माझा मुलगा गमावला

मस्क यांनी एका मुलाखतीदरम्यान आपल्या गमावलेल्या मुलाबद्दल खुलासा करताना म्हटले आहे की, 'वोक माइंड विषाणुमुळे (Woke Mind Virus) त्यांना त्यांचा मुलगा झेविअरला (Xaviar) कायमचे गमवावे लागले. यावरून मस्क यांनी 'वोक माइंट' या विषाणूचा वापर लिंग बदल शस्त्रक्रियेविरूद्ध केला जात असल्याचेही यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.

Elon Musk Son Death
Elon musk |अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक ! एलन मस्क पुन्हा 'EVM'वर बोलले

त्याने मला फसवून कागदपत्रांवर सही घेतली

मस्क यांचा मुलगा झेवियर आता विवियन जेना विल्सन या नावाने ओळखला जातो. ज्याने २०२२ मध्ये ट्रान्सजेंडर म्हणून आपली ओळख समोर आणली. आपल्या मुलाच्या जेंडर बदलावर सांगताना मस्क म्हणाले की, त्याने मला फसवून यौवन अवरोधक या विषाणू प्रयोगासाठीच्या कागदपत्रांवर माझी नकळतपणे सही घेत, माझी परवानगी घेतल्याचेही ते म्हणाले.

Elon Musk Son Death
Elon Musk बनले १२ व्या मुलाचे बाप

.....तर तो आत्महत्या करेल; त्यामुळे परवानगी दिली; मस्क

जगातील सर्वात श्रीमंत व्यकी एलन मस्क यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, त्यावेळी कोविड-19 सुरू होता. मला काही समजण्याआधीच बराच गोंधळ निर्माण झाला होता. असे झाले नाही तर तो आत्महत्या करेल असे मला सांगण्यात आले. त्यामुळे मी या विषाणू वापरासाठी परवानगी दिली. परंतु आता मी या विषाणू वापराचा विरोध करत असल्याचेही मस्क यांनी सांगितले.

Elon Musk Son Death
Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला एका झटक्यात ३० बिलियन डॉलर्सचे नुकसान

गमावलेल्या मुलाला दिले 'डेडनेमिंग' असे नाव

मस्क यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी आपल्या मुलाला डॉक्टरांनी सांगितलेले उपचार घेण्याची परवानगी दिली तेव्हा त्यांना ही औषधे प्रत्यक्षात नसबंदीची औषधे असल्याचे सांगण्यात आले नाही. मस्कच्या म्हणण्यानुसार, मी माझ्या हातून माझा मुलगा गमावला आहे. एलन मस्क यांनी त्याला डेडनेमिंग असे नाव दिले आहे. डेडनेमिंग कारण आता त्याच्या मुलाचे लिंग बदलले आहे आणि तो मुलगी झाला आहे.

logo
Pudhari News
pudhari.news