DIFC Dubai blast news: दुबईच्या इंटरनॅशनल फायनान्शिअल सेंटरमध्ये स्फोट; मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट

DIFC Dubai blast news
DIFC Dubai blast newspudhari
Published on
Updated on

DIFC Dubai blast news: इराणचे मध्य पूर्व आशियातील अनेक देशांवरील हल्ले सुरूच असून इराणने जागतिक आर्थिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुबईतील अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुबईतील सेंट्रल भागातून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट येत असल्याची माहिती मिळत आहे. स्फोटांनी अनेक इमारती हादरल्या आहेत. दुबई हे मध्य पूर्व आशियातील एक आर्थिक केंद्र आहे.

DIFC Dubai blast news
Iran War Effect On Pakistan: पेट्रोल ३२१ रूपये लिटर, त्यात पगारही कट... इराण युद्धाचा पाक नागरिकांना तोंड दाबून बुक्यांचा मार

AFP ने दिलेल्या वृत्तानुसार शेख झायेद रोडवरील अनेक बिल्डिंगमध्ये सायरन वाजल्यानंर लगेचच स्फोट झाल्याचे वृत्त आहे. शेख झायेद रोड हा शहराचा मुख्य हायवे आहे. ही घटना दुबईच्या अर्थिक जिल्ह्याच्या जवळ ड्रोन पडल्याच्या घटनेनंतर लगचेच घडली आहे. इराणने आर्थिक केंद्रांना निशाणा बनवणार असल्याचं सांगितल्यानंतर अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना तिथून बाहेर काढण्यास सुरूवात केली आहे.

DIFC Dubai blast news
Iran Israel US War Update: आमच्या 'या' तीन अटी मान्य करा युद्ध थांबवतो... इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केलं ट्विट

दरम्यान, मारियो नवफल या गुंतवणूकदार असलेल्या व्यक्तीनं एक ट्विट करून दुबईच्या आंतरराष्ट्रीय फायन्शियल सेंटरमध्ये स्फोट झाल्याचा दावा केला. त्यांनी एएफपीच्या हवाल्यानं एक व्हिडिओ आपल्या ट्विटर शेअर केला आहे.

DIFC Dubai blast news
US military aircraft crash: अमेरिकन लष्कराला मोठा धक्का! इराणविरुद्धच्या मोहिमेवरील विमान इराकमध्ये कोसळले; ५ जवान बेपत्ता

मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या युद्धात युएईवर इराण सातत्यानं हल्ला करत आहे. दुबई विमानतळ हे जगातील एक सर्वात व्यस्त असलेलं विमानतळ आहे. त्याचबरोबर दुबईतील पोर्ट, पाम जुमेराह सारखी आलिशान क्षेत्रे यांना इराणकडून टार्गेट करण्यात आलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news