US military aircraft crash: अमेरिकन लष्कराला मोठा धक्का! इराणविरुद्धच्या मोहिमेवरील विमान इराकमध्ये कोसळले; ५ जवान बेपत्ता

US-Israel-Iran War: इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षादरम्यान अमेरिकेच्या हवाई दलाला मोठा धक्का बसला आहे.
US military aircraft crash
US military aircraft crashfile photo
Published on
Updated on

US military aircraft crash

वॉशिंग्टन: इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षादरम्यान अमेरिकेच्या हवाई दलाला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम इराकमध्ये अमेरिकेचे 'केसी-१३५' हे इंधन पुरवठा करणारे विमान कोसळले. या विमानात किमान पाच कर्मचारी होते. दरम्यान, इराकमधील इराण समर्थक 'इस्लामिक रेझिस्टन्स' या सशस्त्र गटाने हे विमान पाडल्याचा दावा केला असून, अमेरिकेकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

US military aircraft crash
Hardeep Singh Puri | औद्योगिक गॅसपुरवठ्यात देशभर 20 टक्के कपात

अमेरिकेच्या 'सेंट्रल कमांड'ने दिलेल्या माहितीनुसार, 'ऑपरेशन एपिक फ्युरी' या मोहिमेदरम्यान दोन विमाने सहभागी झाली होती. त्यापैकी एक विमान सुरक्षितपणे उतरले, मात्र दुसरे विमान पश्चिम इराकमध्ये कोसळले. या विमानात सामान्यतः तीन कर्मचारी असतात, मात्र या उड्डाणावेळी पाच जण उपस्थित होते. त्यांची प्रकृती किंवा जीवितहानीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

"ही घटना मित्रराष्ट्रांच्या हवाई क्षेत्रात घडली असून शोधमोहीम वेगाने सुरू आहे. लष्करी जवानांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही अधिक माहिती गोळा करत आहोत," असे अमेरिकन लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

इराकमधील इराण पुरस्कृत सशस्त्र गटांच्या युतीने (इस्लामिक रेझिस्टन्स) हे विमान पाडल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. "देशाचे सार्वभौमत्व आणि हवाई क्षेत्राच्या रक्षणासाठी आम्ही ही कारवाई केली," असा दावा या गटाने केला आहे.

अमेरिकेसाठी 'केसी-१३५' विमान का महत्वाचे?

कोसळलेले 'केसी-१३५' हे बोईंग कंपनीने तयार केलेले एक महत्त्वाचे टँकर विमान आहे. लांब पल्ल्याच्या मोहिमांवर असताना फायटर जेट्सना हवेतच इंधन पुरवण्याचे काम हे विमान करते. हे विमान कोसळल्याने अमेरिकेच्या हवाई मोहिमेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संघर्षात आतापर्यंत काय घडले?

इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेने आतापर्यंत चार विमाने गमावली आहेत. गेल्या आठवड्यातही कुवेतच्या 'फ्रेंडली फायर'मध्ये अमेरिकेची तीन लढाऊ विमाने चुकून पाडली गेली होती. युद्धाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत अमेरिकेचे ७ जवान शहीद झाले आहेत. पेंटागॉनच्या अहवालानुसार, सुमारे १४० अमेरिकन सैनिक जखमी झाले असून, त्यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे.

US military aircraft crash
Air Force Chief MiG 29 flight | वायुसेना प्रमुखांनी केले ‘मिग-29’मधून उड्डाण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news