Donald Trump Warns Iran: माझं १००० मिसाईल्सच्या खटक्यावर बोट आहे; ...तर इराण बेचिराख करणार, ट्रम्प एवढे का भडकलेत?

Donald Trump Warns Iran
Donald Trump Warns Iranpudhari
Published on
Updated on

Donald Trump Warns Iran: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच इराणसोबतचा शांती करार रद्द झाल्याची घोषणा केली होती. आता त्यांनी इराणला बेचिराख करणार अशी धमकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवरून दिली. त्यांनी दावा केला आहे की अमेरिकेची १००० मिसाईल लॉक्ट अँड लोडेड आहेत. इराणला धमकी देत त्यांनी जर इराणने त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला किंवा तसा कट रचला तर अमेरिकेचे लष्कर वर्षभर इराणच्या प्रत्येक भागात सतत हल्ला करण्यासाठी सज्ज आहे.

Donald Trump Warns Iran
Donald Trump Iran ceasefire : 'ते मूर्ख आणि कचरा...'; इराणसोबतचा युद्धविराम संपल्‍याची ट्रम्प यांची घोषणा

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'जर इराण सरकार जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका इराणच्या सर्व भागांना बेचिराख करून टाकेल. याचा आदेश आधीच देण्यात आला आहे. अमेरिकेचे सैन्य पूर्ण तयार आहे.'

ट्रम्प यांचे हे वक्तव्य अशावेळी आलं आहे ज्यावेळी अमेरिका आणि इराण यांच्या पुन्हा संघर्ष शिगेला पोहचला आहे. जूनमध्ये दोन्ही देशांनी मोठ्या संघर्षानंतर एक तातपुरता युद्धविराम केला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लष्करी कारवाईनंतर पुन्हा या भागातील वातावरण बिघडलं आहे.

Donald Trump Warns Iran
Iran US conflict: ट्रम्प यांचा इशारा इराणने धुडकावला! कुवैतपासून बहरीनपर्यंत अमेरिकेच्या लष्करी तळांवर भीषण हल्ले

ट्रम्प इराणच्या हिट लिस्टवर

नुकतेच ट्रम्प यांनी नाटो बैठकीवेळी आपण इराणच्या हिट लिस्टवर आहोत असं सांगितलं होतं. या यादीत आपण सर्वोच्च स्थानावर आहोत. ही माहिती अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेकडून मिळाली असल्याचं सांगण्यात आलं. इराण त्यांच्याविरूद्ध कट रचत आहे असा दावा त्यांनी केला. त्यानंतर अमेरिकी लष्कराला अजून कडक लष्करी कारवाईची तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Donald Trump Warns Iran
Donald Trump Iran ceasefire : 'ते मूर्ख आणि कचरा...'; इराणसोबतचा युद्धविराम संपल्‍याची ट्रम्प यांची घोषणा

इस्त्रायलने दिली गुप्त माहिती

ट्रम्प यांचे वक्तव्य अशावेळी आलं आहे ज्यावेळी इस्त्रायलकडून अमेरिकेला इराणच्या कथित कटाची माहिती देण्यात आली. असं असलं तरी या दाव्याची पुष्टी अजून झालेली नाही. मात्र यावरून वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात शाब्दिक चकमक वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news