Donald Trump Department of War :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेंटागॉनचे नाव बदलून युद्ध विभाग (Department of War) असं केलं आहे. शुक्रवारी ट्रम्प यांनी संरक्षण विभागाचे नाव बदलून युद्ध विभाग करण्याला मंजूरी दिली होती. याचा उद्येश हा अमेरिका एक शक्तीशाली लष्करी ताकद आहे हे अधोरेखित करणं आहे. मात्र याचा अमेरेकेच्या करदात्यांवर जवळपास १ बिलियन डॉलरचा बोजा पडणार असल्याचं जाणकार सांगत आहेत.
पॉलिटिकोमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार संरक्षण विभागाचं नाव बदलून युद्ध विभाग करण्यासाठी शेकडो कोटींचा खर्च येणार आहे. कारण पेंटागॉन एजन्सी, त्यांचे जागतिक बेस, स्टेशनरी आणि इतर साईन डॉक्युमेंटवर हा सगळा बदल करावा लागणार आहे. या बदलाच्या खर्चाचा थेट बोजा हा करदात्यांवर पडणार आहे.
याबाबत येणाऱ्या खर्चाबाबत ट्रम्प प्रशासनाला विचारण्यात आले असता त्यांनी याबाबत जास्त खर्च येणार नाही. आम्हाला खूप खर्च न करता रिब्रँडिग कसं करायचं हे माहिती आहे. असं उत्तर देण्यात आलं आहे. मात्र जरी ट्रम्प प्रशासन फार उधळपट्टी होणार नाही असा दावा करत असले तरी मिळालेल्या माहितीनुसार हा नावातील बदल प्रशासनाला खर्चात पाडणार आहे.
दरम्यान, ट्रम्प प्रशासनानं विभागाचं नाव बदलण्याचं समर्थन केलं आहे. पत्रकारांशी बोलताना ट्रम्प स्वतः म्हणाले होते. सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी या विभागाचं नाव हे युद्ध विभाग होतं त्यावेळीचा आपला इतिहास हा अविश्वसनीय होता.' यापूर्वी दुसरं महायुद्ध संपल्यानंतर पेंटागॉननं आपल्या विभागाचं नाव बदलून डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स असं केलं होतं.
डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स हे युएस आर्म्ड सर्विसेसचं काम पाहत होतं. त्यानंतर या विभागानं १९८९ मध्ये कॅबिनेट स्तरावरील समिती स्थापन केली होती.
दरम्यान, ट्रम्प यांना डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सचं नाव बदलण्यामागं काय संदेश द्यायचा आहे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याबाबत बीसीसीने दिलेल्या वृत्तानुसार डिपार्टमेंट ऑफ वॉर हे नाव आम्ही सज्ज आहोत असा स्ट्राँग मॅसेज देतो. दुसरीकडं डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स हे नाव संरक्षणात्मक क्षमतांवर जास्त भर देतं.
सध्याची टॅरिफ वॉर आणि एकंदर जागतिक परिस्थिती पाहता अमेरिका आपल्या विभागाचं नाव बदलून एक वेगळाच संदेश देत आहे. भारत, रशिया आणि चीन या देशांच्या प्रमुखांची नुकतीच बैठक झाली होती. त्यानंतर जागतिक राजकारणात काही वेगळी समीकरणं उदयास येण्याची शक्यता आहे. ही नवी समीकरणं अमेरिका वगळून निर्माण होत आहेत. त्यामुळं अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का पोहचो आहे.
त्यातच चीननं आपल्या व्हिक्टरी डे परेडमध्ये अत्याधुनिक शस्त्रांचे प्रदर्शन केले. यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन देखील उपस्थित होते. एक होऊ घातलेली महाशक्ती आणि त्यांच्या जोडीला दोन अनवस्त्रधारी देश यामुळे जागतिक स्तरावर वातावरण अत्यंत संवेदनशील झालं आहे. त्यात आता ट्रम्प यांनी संरक्षण विभागाचं नाव बदलून युद्ध विभाग केलंय. यामुळं तणावाच्या वातावरणात अजूनच भर पडली आहे.