Donald Trump on PM Modi : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत कणखर नेते' : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी उधळली स्तुतीसुमने

Donald Trump on PM Modi :मनिलामध्ये 'क्वाड' बैठकीनिमित्त जपानच्या पंतप्रधान ताकाइची, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज देखील उपस्थित
PM Modi Donald Trump  Quad Summit Manila
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १७) फिलिपाइन्सची राजधानी मनिला येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर 'क्वाड' (Quad) देशांच्या नेत्यांची भेट घेतली.Photo x
Published on: 
Updated on: 

PM Modi Donald Trump Quad Summit Manila : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १७) फिलिपाइन्सची राजधानी मनिला येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर 'क्वाड' (Quad) देशांच्या नेत्यांची भेट घेतली. या बैठकीला जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे देखील उपस्थित होते. क्वाड शिखर परिषदेदरम्यान या सर्व प्रमुख नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येत अधिकृत छायाचित्रण सत्रात (फोटो सेशन) सहभाग घेतला. याप्रसंगी बोलताना ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक करत ते एक 'कणखर' पंतप्रधान असल्याचे म्हटले.

ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

क्वाड बैठकीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे अत्यंत कणखर व्यक्तिमत्त्व आहेत. ट्रम्प यांनी मोदींचा उल्लेख आपला 'मित्र' आणि एक 'महान नेता' असा केला, ज्यांचा संपूर्ण जगात आदर केला जातो. दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनीही दोन्ही नेत्यांमध्ये नियमित संवाद होत असल्याचे सांगत, आपल्यासाठी त्यांचा फोन नेहमीच सुरू असतो, असे स्पष्ट केले. या भेटीदरम्यान इंडो-पॅसिफिक (हिंद-प्रशांत) क्षेत्रात शांतता, आर्थिक सुरक्षा आणि परस्पर सहकार्य अधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला.

PM Modi Donald Trump  Quad Summit Manila
PM Narendra Modi | जनजातीय गौरव दिवस आता राष्ट्रीय उत्सव झाला : पंतप्रधान नरेंद्र मोदी!

१० महिन्यांत अमेरिका चीनची बरोबरी करणार

क्वाड बैठकीत बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिका दुर्मिळ खनिजांच्या उत्पादनात अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. येत्या १० महिन्यांत अमेरिका या उत्पादनाच्या बाबतीत चीनची बरोबरी करेल. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर 'रेअर अर्थ'चे उत्पादन सुरू असून, देशाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचे उत्पादन पुढील १० महिन्यांत देशातच होऊ लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केवळ अमेरिकाच नव्हे, तर भारत आणि जपान देखील या उत्पादनात वेगाने वाढ करत असून तिन्ही देश या दिशेने वेगाने काम करत असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले.

PM Modi Donald Trump  Quad Summit Manila
PM Modi : "पूर्वी प्रत्येक खेड्यात क्रिकेट तज्ज्ञ होते, आता..." : PM मोदी बदलत्या माध्यमांवर नेमकं काय म्हणाले?

सिंगापूरच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा

आसियान परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही नेत्यांनी व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या आराखड्याअंतर्गत (रोडमॅप) झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीत व्यापार व आर्थिक सहकार्य, डिजिटलायझेशन, संरक्षण व सुरक्षा, आरोग्य सेवा, कनेक्टिव्हिटी, कौशल्य विकास, शाश्वतता आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांसारख्या आठ प्रमुख क्षेत्रांतील भागीदारी अधिक पुढे नेण्यावर चर्चा झाली. यावेळी मोदींनी सिंगापूरला आगामी 'आसियान' अध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या आणि भारताच्या पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिले.

PM Modi Donald Trump  Quad Summit Manila
Rajinikanth style - Malaysian PM | मलेशियाच्या पंतप्रधानांनी 'रजनीकांत स्टाइल'मध्ये दिल्या भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा!

पंतप्रधान मोदींनी थायलंडच्या पंतप्रधानांचीही घेतली भेट

आसियानशी संबंधित बैठकांदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नवीराकुल यांचीही भेट घेतली. मोदींनी त्यांचे पंतप्रधानपद स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले. भारत आणि थायलंड हे शेजारी देश असून दोन्ही देशांमध्ये शतकानुशतके जुने ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध असल्याचे मोदी म्हणाले. या बैठकीत व्यापार, संरक्षण व सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि संस्कृती या क्षेत्रांसह भारत-थायलंड धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.