

Astronomer CEO and HR chief viral video Coldplay kiss cam
नवी दिल्ली : हॉलीवूडमधील प्रसिद्ध रॉक बँड कोल्डप्लेच्या बोस्टनमध्ये झालेल्या कॉन्सर्टमुळे सध्या सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या कॉन्सर्टदरम्यान समोर आलेला एक किस कॅम व्हिडिओ व्हायरल झाला असून, एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीच्या सीईओचे कथित अफेअर उघड झाले आहे.
ही घटना गेल्या आठवड्यात Coldplay च्या आयोजित करण्यात आलेल्या कॉन्सर्टदरम्यान घडली. न्यू यॉर्कस्थित सॉफ्टवेअर कंपनी अॅस्ट्रोनॉमरचे सीईओ अँडी बायरन हे बोस्टनमधील कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये त्यांची सहकारी एचआर चीफ क्रिस्टिन कॅबोटसोबत (Kristin Cabot) गेले होते. एका व्हिडिओमध्ये ते एकमेकांना मिठी मारताना दिसले, ज्यामुळे त्यांच्यातील कथित प्रेमप्रकरण उघड झाले आहे. यानंतर कॉन्सर्टमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
अँडी बायरन जुलै २०२३ पासून अॅस्ट्रोनॉमरचे सीईओ आहेत. यापूर्वी त्यांनी सायबरसुरक्षा आणि सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले आहे. ५० वर्षीय बायरन हे मेगन केरिगन बायरन यांचे पती असून, त्यांना दोन मुले आहेत. तर क्रिस्टिन कॅबोट नऊ महिन्यांपूर्वी एचआर प्रमुख म्हणून कंपनीत रूजू झाल्या. क्रिस्टिन कॅबोटही विवाहित असल्याचे सांगितले जात आहे.
1 अब्ज डॉलर्सची किंमत असलेली अॅस्ट्रोनॉमर ही एक सॉफ्टवेअर कंपनी आहे. 2022 मध्ये या कंपनीने यूनिकॉर्न दर्जा मिळवला. कंपनीचा मुख्य प्रोडक्ट आहे ‘अॅस्ट्रो’, जो डेटा मॅनेजमेंटसाठी वापरला जातो. अँडी बायरन हे 2023 च्या जुलैमध्ये CEO म्हणून रुजू झाले होते. त्याआधी त्यांनी Lacework, Cybereason, Fuze, आणि BMC Software मध्ये वरिष्ठ पदांवर काम केले होते.
कोल्डप्ले बँडचे सदस्य क्रिस मार्टिन, गाय बैरीमॅन, जॉनी बकलँड आणि विल चॅम्पियन कॉन्सर्टमध्ये उपस्थित होते. जेव्हा कॅमेरा प्रेक्षकांवर फिरला, तेव्हा मार्टिनने त्या दोघांकडे पाहून चिडवत म्हटलं, "अरे, त्यांना पाहा! काय चाललंय इथे?" कॅमेऱ्यावर दिसताच अँडी आणि क्रिस्टिनने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. यावर मार्टिनने मिश्कीलपणे प्रतिक्रिया दिली, "त्यांचं अफेअर आहे" त्यावर उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कंपनीकडून या प्रकरणावर अद्याप कोणतंही अधिकृत विधान देण्यात आलेलं नाही. मात्र, बायरन हे कॅबोटचे वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे ऑफिसच्या आचारसंहितेच्या दृष्टिकोनातूनही ही घटना गंभीर बनली आहे.