Autonomous Trucks: आता एक ड्रायव्हर ५ ट्रक चालवणार! मालवाहतूक क्षेत्रात नवा चमत्कार; काय आहे '१+४' तंत्रज्ञान?

One Driver Operate Five Trucks: चीनमधील प्रसिद्ध ट्रक उत्पादक कंपनी SANY ने आपल्या चौथ्या पिढीतील 'ऑटोनॉमस' (विनाचालक) ट्रकचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे.
One Driver Operate Five Trucks
One Driver Operate Five Trucksfile photo
Published on
Updated on

Autonomous Trucks

बीजिंग: वाहतूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात चीनने पुन्हा एकदा जगाला थक्क करणारी झेप घेतली आहे. चीनमधील प्रसिद्ध ट्रक उत्पादक कंपनी SANY ने आपल्या चौथ्या पिढीतील 'ऑटोनॉमस' (विनाचालक) ट्रकचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, रस्त्यावर धावणाऱ्या पाच ट्रकचा ताफा आता केवळ एक चालक चालवणार आहे. २०२६ या वर्षाअखेरपर्यंत हे ट्रक प्रत्यक्ष रस्त्यावर धावताना दिसू शकतात.

One Driver Operate Five Trucks
Mahindra XUV 7XO: महिंद्राने लाँच केली हाय-टेक XUV 7XO; किंमत आणि अलेक्सा, ChatGPT सह भन्नाट फीचर्स एकदा पाहाच!

काय आहे '१+४' प्लॅटूनिंग तंत्रज्ञान?

SANY कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी Pony.ai या प्रसिद्ध सेल्फ-ड्रायव्हिंग टेक कंपनी सोबत भागीदारी केली आहे. या सिस्टीममध्ये पाच ट्रक एका रांगेत चालतील. याला 'प्लॅटूनिंग' असे म्हटले जाते. ताफ्यात सर्वात पुढे असलेला ट्रक एक चालक चालवेल. त्यानंतर मागून येणारे चारही ट्रक पूर्णपणे स्वयंचलित असतील. हे ट्रक पहिल्या ट्रकवर लक्ष ठेवून हुबेहूब त्याचे अनुसरण करतील. पहिला ट्रक ज्या वेगाने धावेल किंवा जिथे वळण घेईल, तिथेच मागचे चारही ट्रक आपोआप वळतील.

खर्चात मोठी बचत, नफ्यात दुप्पट वाढ

मालवाहतूक करणाऱ्या कंपन्यांसाठी ही तंत्रज्ञान क्रांती ठरणार आहे. चाचणी दरम्यान समोर आलेल्या आकडेवारीनुसार, मालवाहतुकीच्या प्रति किलोमीटर खर्चात तब्बल २९ टक्क्यांची बचत झाली आहे. कंपनीच्या ऑपरेशनल नफ्यात १९५ टक्क्यांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे. जागतिक स्तरावर ट्रक चालकांची मोठी कमतरता भासत आहे, या तंत्रज्ञानामुळे एकाच चालकाच्या मदतीने पाच पट मालवाहतूक करणे शक्य होईल.

अपघाताचा धोका होणार कमी

हे ट्रक केवळ हायटेकच नाहीत, तर पर्यावरणाचे रक्षण करणारेही आहेत. या ट्रकमध्ये 400 kWh ची शक्तिशाली बॅटरी आहे. विशेष म्हणजे बॅटरी संपल्यावर ती चार्ज करण्यासाठी थांबण्याची गरज नाही; 'बॅटरी स्वॅपिंग' तंत्रज्ञानामुळे काही मिनिटांत जुनी बॅटरी काढून नवीन बॅटरी बसवता येईल. ट्रकमध्ये रडार, प्रगत कॅमेरे आणि सेन्सिंग यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे रस्त्यावरील अडथळे, इतर वाहने आणि पादचाऱ्यांची माहिती ट्रकला आधीच मिळते, ज्यामुळे अपघाताचा धोका कमी होईल.

One Driver Operate Five Trucks
Human Eye Vision: आपले डोळे जगाला उलटे का पाहतात? विज्ञानाचे हे गुपित तुम्हाला माहीत आहे का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news