ChatGPT च्‍या मदतीने रचला पतीच्‍या हत्येचा कट? विषप्रयोग करण्यासाठी AI कडून सल्‍ला घेतल्‍याचा दावा

अमेरिकेतील एकाने OpenAI कंपनीविरुद्ध न्यायालयात कायदेशीर लढा
ChatGPT Murder Plot Lawsuit
ChatGPT Murder Plot Lawsuit
Published on: 
Updated on: 

ChatGPT Murder Plot Lawsuit : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चॅटबॉट 'चॅटजीपीटी'च्या माध्यमातून पत्नीने पतीला विषप्रयोग करून संपवण्याचा अत्यंत धक्कादायक कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अमेरिकेतील एका व्यक्तीने 'ओपनएआय' (OpenAI) कंपनीविरुद्ध न्यायालयात कायदेशीर लढा पुकारला आहे.

पतीचा दावा काय?

उत्तर कॅरोलिना राज्यातील शार्लट येथे राहणाऱ्या जेम्स गेट्स असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या दाव्यानुसार, त्यांची पत्नी चेरिल गेट्स हिने २०२५ च्या उन्हाळ्यात चॅटजीपीटीशी शेकडो वेळा संवाद साधून पतीच्या हत्येचा हा भयानक कट तयार केला.

एक चि्ठ्ठीमुळे उघड झाला कट

सेन फ्रान्सिस्को उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दिवाणी खटल्यानुसार, जेम्स गेट्स हे जुलै २०२५ मध्ये गंभीर आजारी पडले होते, परंतु उपचारांमुळे ते सुदैवाने बरे झाले. त्यानंतर त्यांना पत्नीची एक चि्ठ्ठी सापडली. यामध्‍ये कटाचा उल्लेख होता.

ChatGPT Murder Plot Lawsuit
ChatGPT Bear Image | चॅटजीपीटीने बनवला अस्वलाचा फोटो; रशियन महिलेला जबर दंड

चॅटजीपीटीचा चॅट डिलीट करण्‍याचीही सूचना

चॅटजीपीटीला जुने चॅट (History) डिलीट करण्याची सूचनाही त्यामध्ये लिहिलेली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत ऑक्टोबर २०२५ मध्ये चेरिल गेट्स हिला अटक केली. तिच्‍यावर खूनाचा प्रयत्न आणि अन्न किंवा पेयामध्ये विषारी पदार्थ मिसळल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ChatGPT Murder Plot Lawsuit
ChatGPT Fake Articles: AIने लेख लिहिले, लेखकही बनावट! ChatGPTच्या मदतीने इराणने २० न्यूज वेबसाइट्सवर १०० लेख केले प्रसिद्ध

OpenAI कंपनींवर नेमका कोणता आरोप?

पीडित जेम्स यांच्‍या वकीलांनी 'सीबीएस न्यूज'शी बोलताना सांगितले की, " एआय सिस्टीमने चेरिल यांच्या विचारांना दुजोरा दिला, त्यांना मानसिक आधार दिला आणि हत्येचे नियोजन करण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले."

ChatGPT Murder Plot Lawsuit
Red Fort Blast Case : YouTube, ChatGPT वरून रॉकेटचे धडे अन् कार बॉम्बचा वापर; लाल किल्ला हल्ल्याबाबत NIA चे मोठे खुलासे

पत्‍नी गेली होती चॅटबॉटच्‍या आहारी

खटल्यात नमूद केल्यानुसार, चेरिल या चॅटबॉटला आपले सर्वात जवळचे विश्वासू मानू लागल्या होत्या. कामाच्या गोष्टींपासून ते मुलांच्या हालचालींचे नियोजन करण्यापर्यंत आणि वैवाहिक समस्यांवर सल्ला घेण्यापासून ते प्रिस्क्रिप्शनच्या डोसबाबत माहिती मिळवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी ती चॅटजीपीटीचा वापर करत होती. "माझी पत्नी कोणत्याही पारंपारिक अर्थाने 'असुरक्षित' वर्गटातील नव्हती, पण तरीही ती मानसिकदृष्ट्या कमकुवत ठरली. आपण सर्वच कधी ना कधी या टप्प्यातून जातो," असे जेम्स यांनी आपल्या वकीलांच्या माध्यमातून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ओपनएआयची भूमिका काय?

या कायदेशीर दाव्यावर प्रतिक्रिया देताना 'ओपनएआय'च्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, चेरिल हिला या प्लॅटफॉर्मवरून बडतर्फ (Ban) करण्यात आले असून युजर्सची सुरक्षा ही कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता आहे. चॅटजीपीटीला मानसिक तणावाचे संकेत ओळखता यावेत. युजर्सना स्थानिक पातळीवरील आपत्कालीन मदत व हेल्पलाईनची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी कंपनी मानसोपचार तज्ज्ञांच्या सहकार्याने सतत काम करत आहे, असल्‍याचा दावाही त्‍यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.