Car Accident
Car Accident

जॉर्जियामध्ये कार अपघात; 3 भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यांचा मृत्यू, 2 जखमी

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जॉर्जियातील अल्फारेटा येथे कार उलटल्याने दोन महिलांसह तीन भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर या कार अपघातात अन्य दोन भारतीय-अमेरिकन जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार झाडाला धडकली आणि हा अपघात झाला. Car Accident

माहितीनुसार, जॉर्जियातील अल्फारेटा येथे वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार झाडाला धडकली आणि उलटली. या भीषण अपघातात तीन भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दोन भारतीय-अमेरिकन  जखमी झाले. ठार झालेल्यांमध्ये दोन तरुणींचा समावेश असुन तिघेही  १८ वर्षांचे  आहेत. आर्यन जोशी, श्रिया अवसरला आणि अन्वी शर्मा असे मृत झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. तिघेही जॉर्जिया विद्यापीठात प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news