Bill Gates AI Warning : एआय 1 अब्ज लोकांचा जीव घेईल! बिल गेटस्‌ यांच्या गंभीर इशार्‍याने खळबळ

वाईट हेतू असलेल्या लोकांकडून लेटेस्ट एआय टूल्सचा वापर करणे, हे आतापर्यंतचे सर्वात खतरनाक शस्त्र ठरू शकते.
Bill Gates Warning About AI
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स अर्थात एआय तंत्रज्ञानामुळे दैनंदिन जीवनातील अनेक बाबी सोप्‍या झाल्‍या असल्‍या तरी त्‍यामुळे होणारी विनाशलीला अमेरिकेतही पाहायला मिळत आहे. याचप्रमाणे इराण युद्धामध्येही एआयचा वापर केल्याचे समोर येत आहे. हे पाहता तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज एआयला घाबरू लागले असून मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि समाजसेवक बिल गेटस्‌ यांनी एआयला वेळीच आवर घातला नाही तर हे तंत्रज्ञान जगभरात एक अब्‍ज लोकांच्‍या मृत्‍यूचे कारण ठरू शकतो, असा थेट इशाराच दिला आहे.

बिल गेटस्‌ यांनी अमेरिकेच्या खासदारांना आणि कायदा लागू करणाऱ्या अधिकाऱ्यांना एआयच्या विकासाचे नियमन (रेग्युलेट) करण्याचे आवाहन केले आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानावर नियंत्रण किंवा बंधन न राहिल्यास यामुळे एक अब्ज लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तरीही स्वतःहून नियम बनवणे पुरेसे आहे, असे कोणालाही वाटत नाही.

एआय चुकीच्या हातात पडले, तर ते इतके शक्तिशाली ठरेल की, त्‍याच्‍या माध्‍यमातून घडवल्‍या जाणार्‍या घटना एक अब्ज लोकांच्‍या मृत्यूस कारण ठरतील. वाईट हेतू असलेल्या लोकांकडून लेटेस्ट एआय टूल्सचा वापर करणे, हे आतापर्यंतचे सर्वात खतरनाक शस्त्र ठरू शकते.

- बिल गेटस्‌

Bill Gates Warning About AI
Burj Khalifa : बुर्ज खलिफामध्ये राहणारे लोक खिडक्या उघडू शकतात का? जाणून घ्या, घरात हवा कशी येते!

इतर टेक दिग्गजांचाही इशारा

बिल गेटस् यांच्याप्रमाणेच सैम ऑल्टमैन व एलन मस्क यांसारख्या इतर टेक दिग्गजांनीही एआयच्या विकासाचा वेग मंद करण्याची मागणी केली आहे. काही तज्ज्ञांच्या मते, एआयमुळे बायो वेपन आणि न्यूक्लियर वॉर (अणुयुद्ध) यांसारख्या मार्गांनी मानवाचा मोठा विनाश होऊ शकतो. खुद्द मायक्रोसॉफ्टवरही एआयशी संबंधित काही भीतीदायक शंकांना खतपाणी घातल्याचा आरोप झाला आहे.

Bill Gates Warning About AI
Elephant News : पृथ्वीवरून हत्ती नाहीसे झाले तर काय घडते? आफ्रिकेतील १५ वर्षांच्या संशोधनातून समोर आले धक्कादायक वास्तव

‘द गार्डियन’मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध लेखानुसार, कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मायक्रोसॉफ्टला इस्रायली सैन्यासोबतचे संबंध तोडण्याची मागणी करत मोहीम सुरू केली आहे. इस्रायली सैन्याने गाझा व अमेरिकन सैन्यासोबत मिळून इराणमध्येही लोका मारण्यासाठी एआय टूल्सचा वापर केला आहे. तर ‘नो एज्योर फॉर अपार्थाइड’ या गटाशी संबंधित लेखाचे लेखक मोहम्मद हुसैन आणि ग्रॅनेट किम यांनी इशारा दिला की, एआयमुळे होणारा विनाश अमेरिकेतही पाहायला मिळत आहे.

हुसैन व किम यांनी लिहिले की, अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटने स्थलांतरितांवर नजर ठेवून त्यांच्या अटकेसह देशाबाहेर हाकलून देण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या ‘एज्योर’सारख्या एआय टूल्सचा वापर केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news