Sunita Willams : अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सबद्दल मोठी बातमी, नासाने दिली परतीची माहिती

सुनिता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर दीड महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत
Astronaut Sunita Williams
सुनिता विल्यम्स यांच्याबद्दल मोठी बातमीPudhari File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर हे सुमारे दीड महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. बोईंग स्टारलाइनरमधील बिघाडामुळे दोन्ही अंतराळवीर अद्याप परत येऊ शकलेले नाहीत. दरम्यान, अंतराळवीरांबाबत चांगली बातमी समोर आली आहे. नासा आणि बोईंग अभियंत्यांनी स्टारलाइनर स्पेसशिपच्या थ्रस्टरची चाचणी पूर्ण केली आहे. नासा आणि बोईंग या चाचण्यांची वाट पाहत होते आणि अंतराळयानाच्या परतीची योजना तयार करत होते. त्यामुळे या महिन्याच्या शेवटी परतीचे उड्डाण होवू शकते, असे नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Astronaut Sunita Williams
Sunita Williams | सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम वाढणार

नासाचे फ्लाइट डायरेक्टर एड व्हॅन सिसे यांनी जाहीर केले की, नासा टीमचा एक उपसंच बोईंगच्या CST-100 स्टारलाइनर अंतराळयान आणि त्याचे क्रू सदस्य अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांच्याशी जवळून काम करत आहे. या सहकार्याचे उद्दिष्ट अंतराळयानाच्या सिस्टीममध्ये सुधारणा करणे आणि त्याच्या आगामी निर्गमनासाठी तयार करणे हे आहे. हे दोन्ही अंतराळवीर गेल्या दीड महिन्यापासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर थांबले आहेत. त्यामुळे अभियंते अंतराळ यानामधील दोष दूर करण्यात आणि परतीच्या तयारीत व्यस्त होते.

Astronaut Sunita Williams
तांत्रिक बिघाडामुळे अद्याप सुनीता विल्यम्स अवकाशातच

70 तास पुरेल इतके हेलियम

अंतराळयानाच्या प्रक्षेपणाच्या आधी थ्रस्टर्स नियंत्रित करणाऱ्या हेलियम टँकमधून गळती होत होती. त्यामुळे प्रक्षेपण लांबणीवर पडले. गेल्या महिन्यात अधिकाऱ्यांनी सांगितले होते की अंतराळ यानात 70 तास हेलियम आहे, तर परत येण्यासाठी केवळ 7 तास हेलियम आवश्यक आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, अधिकाऱ्यांनी सांगितले की आवश्यक असल्यास अंतराळयान अजूनही परत येऊ शकते. पण तसे करण्यास ते पूर्णपणे तयार नसल्याचेही सांगितले. या महिन्याच्या अखेरीस परतीचे उड्डाण होऊ शकते, असे नासा आणि बोईंगने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news