Anthropic IPO AI risk to humanity : एआयमुळे मानवाच्या अस्तित्वालाच धोका, ‘अँथ्रॉपिक’चा ‘आयपीओ’ दस्तावेजात गंभीर इशारा

२ ट्रिलियन डॉलर्सच्या मूल्यांकनाची तयारी
Anthropic IPO filing AI risk threat to humanity
Published on: 
Updated on: 

Anthropic IPO filing AI risk threat to humanity

पॅरिस/वॉशिंग्टन : अमेरिकेतील आघाडीची कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कंपनी ‘अँथ्रॉपिक’ने आपल्या आगामी ‘इनिशियल पब्लिक ऑफरिंग’च्या (आयपीओ) मसुद्यात गुंतवणूकदारांना धक्कादायक इशारा दिला आहे. प्रगत एआय तंत्रज्ञानामुळे भविष्यात थेट मानवाच्या अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा उल्लेख कंपनीने अमेरिकन बाजार नियामक मंडळाकडे सादर केलेल्या ‘एस-१’ मसुद्यात केला आहे.

‘क्लॉड’ (Claude) या लोकप्रिय एआय मॉडेलची निर्मिती करणाऱ्या ‘अँथ्रॉपिक’ने नमूद केले आहे की, कठोर सुरक्षा यंत्रणा आणि नियम लागू असतानाही अतिप्रगत मॉडेल्स स्वतःच्या पूर्वअंदाजापलीकडे जाऊन अनपेक्षित वर्तन करू शकतात. अलीकडच्या काळात झालेल्या सायबर हल्ले आणि हॅकिंगच्या वाढत्या घटनांमुळे जगभरातील सरकारे व तज्ज्ञांमध्ये चिंता असताना कंपनीने स्वतःच ही कबुली दिली आहे. दरम्यान, ‘अँथ्रॉपिक’चे प्रमुख डारिओ अमोदेई हे वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

Anthropic IPO filing AI risk threat to humanity
China Coca Cola death: १० मिनिटांत १.५ लिटर कोल्ड ड्रिंक प्यायल्याने २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक कारण

५१८ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा महाकाय आराखडा

अवघ्या सहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या कंपनीने भविष्यात एआय पायाभूत सुविधा आणि कम्प्युटिंग क्षमतेसाठी तब्बल ५१८ अब्ज डॉलर्स खर्च करण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा आखला आहे. वेगाने होत असलेल्या संशोधनामुळे कंपनीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.

८ अब्ज डॉलर्सचा तोटा

गेल्या वर्षात ‘अँथ्रॉपिक’चा महसूल ४.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचला असला तरी विकास आणि संशोधन खर्चात प्रचंड वाढ झाल्याने कंपनीला ८ अब्ज डॉलर्सहून अधिक कार्यान्वयन तोटा सहन करावा लागला आहे.

Anthropic IPO filing AI risk threat to humanity
Bill Gates AI Warning : एआय 1 अब्ज लोकांचा जीव घेईल! बिल गेटस्‌ यांच्या गंभीर इशार्‍याने खळबळ

विक्रमी मूल्यांकनाची अपेक्षा

आगामी काही आठवड्यांत येणारा हा ‘आयपीओ’ जागतिक भांडवली बाजारातील आतापर्यंतचा सर्वात मोठा शेअर विक्रीचा व्यवहार ठरू शकतो. बाजारातील तज्ज्ञांनुसार, या ‘आयपीओ’द्वारे ‘अँथ्रॉपिक’चे मूल्यांकन तब्बल २ ट्रिलियन डॉलर्स (सुमारे २०० लाख कोटी रुपये) गाठण्याची दाट शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news