Fuel Price Hike : विमान इंधनाच्या दरात तब्बल 121 टक्के वाढ

Fuel Price Hike : विमान इंधनाच्या दरात तब्बल 121 टक्के वाढ
Published on
Updated on

दुबई : जागतिक व्यापार आणि तेलपुरवठ्यातील विस्कळीततेमुळे एप्रिल महिन्यात विमानांच्या इंधनात तब्बल 121.1 टक्क्यांची अफाट वाढ झाली, तर कच्च्या तेलाचे दर 77.7 टक्क्यांनी वाढले आहेत, अशी माहिती इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या अहवालात देण्यात आली आहे.

आयएटीएचे महासंचालक विली वॉल्श यांनी सांगितले की, इंधनाचे दर दुप्पट झाल्याने विमान कंपन्या हा वाढीव खर्च थेट ग्राहकांवर ढकलत आहेत, त्यामुळे तिकिटांचे दर वाढत आहेत.

प्रवासी संख्येत मोठी घट

अमेरिक-इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांना आपले मार्ग बदलावे लागले होते. यामुळे एप्रिल 2026 मध्ये मध्य पूर्वेतील विमान कंपन्यांच्या प्रवासी मागणीत 46.6 टक्क्यांची मोठी घट नोंदवली गेली. या घसरणीमुळे जागतिक प्रवासी बाजारपेठेतही 3.4 टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, मार्च महिन्याच्या तुलनेत (जेव्हा 59.2 टक्के घसरण झाली होती) ही परिस्थिती काहीशी सुधारली आहे. दुसरीकडे, आशिया-पॅसिफिक आणि लॅटिन अमेरिकेत मात्र विमानांची मागणी वाढली आहे.

संयुक्त अरब अमिरातीमधील प्रवाशांसाठी दिलासादायक बाब म्हणजे तिथली विमान सेवा आता पूर्वपदावर आली आहे. 2 मे रोजी यूएईच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने सर्व तात्पुरते निर्बंध मागे घेतले आहेत. एमिरेटस्‌‍ एअरलाईन्स सध्या 137 आंतरराष्ट्रीय ठिकाणांसाठी, तर एतिहाद एअरवेज 80 ठिकाणांसाठी पूर्ण क्षमतेने उड्डाणे करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news