मेक्सिको : पुढारी ऑनलाईन डेस्क
मेक्सिकोच्या (Mexico) चियापास राज्यात ट्रकचा भीषण अपघात होऊन ५३ जण ठार झाले असून ५८ जण जखमी झाले आहेत. या ट्रकमधून स्थलांतरित लोक प्रवास करत होते. रस्त्याच्या वळणावर ट्रक पलटी झाल्याने हा अपघात झाला.
मेक्सिकोमधील सर्वात भीषण अपघातांपैकी हा एक आहे. यात किमान ५८ लोक जखमी झाले आहेत, तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती चियापास राज्याच्या संरक्षण एजन्सीचे प्रमुख लुईस मॅन्युएल गार्सिया यांनी दिली आहे.
मृतांमध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. अपघातात मृत झालेले लोक हे स्थलांतरित असून ते होंडुरास आणि ग्वाटेमालाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. चियापास राज्याची राजधानी गुटिएरेझ येथे हा अपघात झाला. ट्रक वळण घेत असताना पलटी झाला आणि पादचारी पुलाला जाऊन धडकला. यात ५३ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
कायदेशीर कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरितांसाठी चियापास हा एक मोठा ट्रान्झिट पॉइंट आहे. अलिकडच्या काही वर्षांत लोकांचे चियापासमध्ये मध्य अमेरिकेतून मेक्सिकोमार्गे (Mexico) अमेरिकेत स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. एका वृत्तानुसार, ऑक्टोबरपर्यंतच्या एका वर्षात १७ लाख स्थलांतरितांनी अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा :