अमेरिकेत १० खलिस्तान्यांवर लूकआऊट नोटिशीची तयारी | पुढारी

अमेरिकेत १० खलिस्तान्यांवर लूकआऊट नोटिशीची तयारी

वॉशिंग्टन : मार्च 2023 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोतील भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तान सर्मथकांनी हल्ला केला होता. एफबीआय या अमेरिकन मध्यवर्ती तपास यंत्रणेने आता या हल्ल्यातील 10 आरोपींविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्व दहा आरोपींना यंत्रणा ताब्यात घेणारच, ही बाब वरीलप्रमाणे नोटिशीतून अधोरेखित होते.

आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला भारतीय अधिकारी आणि पुढे भारतीय कायदा अंमलबजावणी संस्थांकडून या सर्वांची चौकशी होईल. सर्वांच्या अटकेचा मार्गही मोकळा होईल. 18 आणि 19 मार्च 2023 च्या मध्यरात्री खलिस्तान्यांनी हा हल्ला केला होता. बेकायदा प्रवेश करून वाणिज्य दूतावासाला आग लावण्याचा प्रयत्न या आरोपींनी केला होता. दूतावासातील अधिकार्‍यांना मारहाणही केली होती. भारतीय दूतावासावरील हल्ल्यात सहभागी असलेल्या खलिस्तानी संघटनांवर गुन्हेगार म्हणून कारवाई केली जाईल, असे एफबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

Back to top button