China Flood | दक्षिण चीनमध्ये पावसाचा हाहाकार; ४ ठार, हजारोंना सुरक्षितस्थळी हलवले | पुढारी

China Flood | दक्षिण चीनमध्ये पावसाचा हाहाकार; ४ ठार, हजारोंना सुरक्षितस्थळी हलवले

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनच्या दक्षिण भागात असलेल्या गंगडाँग प्रांताला गेल्या काही दिवसात तुफानी पावसानो झोडपले आहे. या प्रांतत आलेल्या पुरामुळे आतापर्यंत ४ लोक ठार झाले असून जवळपास १ लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. या परिसरात अतिवृष्टी आणि पूर दुर्मिळ मानले जातात.

गेल्या काही दिवसांत या परिसरात सातत्याने अतिवृष्टी होत आहे. बुधवारी पावसाने थोडी उसंत घेतल्यानंतर नागरिकांची घरे स्वच्छ करण्यासाठी धावपळ केल्याचे दिसून आले, असे AFP या वृत्तसेवेने म्हटले आहे. बऱ्याच भागांत गुडगाभर पाणी साठलेले आहे.
दरम्यान या प्रांतात आणखी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. या परिसरात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असल्याच्या अफवा पसरल्याचे या वृत्तात म्हटले आहे. प्रशासनाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आव्हान केलेले आहे.

हा प्रांत चीनमधील निर्मिती उद्योगाचे केंद्र आहे आणि येथे १२ कोटींवर लोकसंख्या आहे. यापूर्वी १९५४ला अशी पूरस्थिती निर्माण झालेली होती. येथील जलसंपदा विभागातील प्रमुख अधिकारी यिन झिजे यांनी हवामान बदलाचे हे दृश्य परिणाम असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button