इराणचा इस्रायलवर हल्ला; २०० क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले | पुढारी

इराणचा इस्रायलवर हल्ला; २०० क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले

पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणने शनिवारी रात्री इस्रायलवर ड्रोन हल्ला केला. इस्रायलवर २०० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले आहेत. ज्यात किलर ड्रोन, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. क्षेपणास्त्रांमुळे इस्रायलच्या लष्करी तळांचे मोठे नुकसान झाले आहे. इराणच्या लष्कराने एक निवेदन जारी करून या हल्ल्याला ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस’ (Operation True Promise) असे नाव दिले आहे.

इस्त्रायलने १ एप्रिल रोजी इराणच्या दमास्कस वाणिज्य दूतावासावर हल्ला केला होता. ज्यात इराणचे दोन वरिष्ठ कमांडरसह सात अधिकारी मारले गेले होते. या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचे इराणने म्हटले होते. शनिवारी मध्यरात्री इराणने इस्रायलवर हल्ला केला. इस्रायली लष्कर आयडीएफ (IDF) च्या प्रवक्त्याने सांगितले की, इराणच्या हल्ल्यात दक्षिण इस्रायलमधील लष्करी तळाचे नुकसान झाले आहे. इस्रायलने एरो एरियल डिफेन्स सिस्टीमद्वारे यापैकी बहुतेक क्षेपणास्त्रे डागली आहेत. हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराने हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

इस्रायलने यूएनएससीची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही फोनवर चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली. संयुक्त राष्ट्र संघानेही आज तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, पुढील काही तासांत इराण इस्रायलवर आणखी क्षेपणास्त्र हल्ले करण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

इराणच्या मदतीला अमेरिका धावली

जगातील अनेक देश युद्धात बुडाले आहेत. रशिया-युक्रेन युद्ध दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असताना, हमास आणि इस्रायलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. आता इराण आणि इस्रायल यांच्यातही युद्ध सुरू होताना दिसत आहे. इराणने शनिवारी इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यानंतर दोन कट्टर शत्रू देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणला इस्रायली लष्कर प्रत्युत्तर देत आहे. त्याचबरोबर अमेरिकाही आपल्या मित्र देशाला पाठिंबा देत आहे. इराणने इस्रायलच्या दिशेने उडवलेले ड्रोन अमेरिकन लष्कर खाली पाडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, ‘अमेरिकन सैन्य इस्रायलला लक्ष्य करणाऱ्या इराणी ड्रोनचा नाश करत राहील. आमचे सैन्य अधिक सुरक्षा सहाय्य प्रदान करण्यासाठी आणि तेथील प्रदेशात कार्यरत असलेल्या यूएस सैन्याचे संरक्षण करण्यासाठी तैनात केले आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button