Jack Vs Kangna : ट्विटर सीईओ जॅक डाॅर्सीच्या राजीनाम्यानंतर कंगना खूश | पुढारी

Jack Vs Kangna : ट्विटर सीईओ जॅक डाॅर्सीच्या राजीनाम्यानंतर कंगना खूश

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरात ट्विटर अत्यंत महत्त्वाचं माध्यम समजलं जातं. खूप मोठा वर्ग ट्विटरचा वापरकर्ता आहे. त्यामुळे ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कोण आहे, हे जागतिक पातळीवर महत्त्वाचं समजलं जातं. यापूर्वी ट्विटरच्या सीईओपदी असणारे जॅक डाॅर्सी यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी भारताचे पराग अगरवाल यांची नियुक्त करण्यात आली. त्यामुळे जॅक डाॅर्सीच्या राजीनाम्यामुळे अभिनेत्री कंगना राणावत (Jack Vs Kangna) सोशल मीडियावर खूश झाल्याचे दिसत आहे.

अभिनेत्री कंगनाने (Jack Vs Kangna) आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीच्या माध्यमातून आनंद व्यक्त करताना “बाय बाय चाचा जॅक…” अशी मिश्किल टिप्पणी केलेली आहे. अनेक सेलेब्रिटिंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पराग अगरवाल यांचं ट्विटरच्या सीईओ पदी नियुक्ती झाल्यानंतर अभिनंदन केलं आहे.

ट्विटरनं केले हाेते कंगनाचं अकाऊंट बंद 

कंगना आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अशीच वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य तिने ट्विटरवरूनही केले हाेते. त्यामुळे ट्विटर आणि कंगना यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. त्यामुळे कंगनाचं अकाऊंट बंद करण्यात आलं होतं.  नियमांचं उल्लंघन केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्‍यात आली  होती. यानंतर कंगनाने ‘इन्स्टाग्राम आणि कू’चा वापर जोरदार सुूरू केला हाेता.

Parag Agrawal : मुंबई आयआयटी ते ट्विटरचा प्रवास

२०११ मध्‍ये पराग अग्रवाल यांचे आणि ट्विटरचे २०११ मध्ये नाते बनले. याआधी त्यांनी याहू आणि मायक्रोसॉफ्टसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये काम केले हाेते. अग्रवाल हे आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी केली आहे. ट्विटरवर जाहिरात अभियंता म्हणून रूजू झालेल्या अग्रवाल यांना ऑक्टोबर २०१७ मध्ये कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) बनवण्यात आले. कंपनीचे तांत्रिक धोरण ते मोठ्या शिताफीने हाताळत होते. PeopleAI च्या मते, परागची यांची एकूण संपत्ती १.५२ मिलियन डॉलर इतकी आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button