Moscow terror attack: मास्‍को दहशतवादी हल्‍ला: ४ दहशतवाद्यांसह ११ जणांना अटक | पुढारी

Moscow terror attack: मास्‍को दहशतवादी हल्‍ला: ४ दहशतवाद्यांसह ११ जणांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क: रशियाची राजधानी मास्‍कोमध्‍ये झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍याने जग हादरले आहे. या हल्ल्यातील मृतांची संख्या ९३ वर पोहचली आहे. तर १५० हून अधिक जखमी झाले आहेत. दरम्यामन या हल्ल्याप्रकरणी चार दहशतवाद्यांसह अकरा जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती रशियन मीडियाने दिल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. (Moscow terror attack)

रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसच्या प्रमुखांनी शनिवारी (दि.२३) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सांगितले की, अटक करण्यात आलेल्या ११ जणांपैकी चार जण या हल्ल्यात थेट सहभागी आहेत. मास्को हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये चार ‘दहशतवादी’ आहेत, असे रशियन मीडियाने म्हटले आहे. (Moscow terror attack)

पश्चिम मॉस्कोमधील कॉन्सर्ट हॉलमध्ये हल्लेखोरांनी स्फोट केल्यानंतर आणि जमावावर गोळीबार केल्याने अनेक मृत्यूची नोंद झाली. इस्लामिक स्‍टेट-खोरासान गटाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या निवेदनात हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, असे माध्यमांनी स्पष्ट केले आहे. (Moscow terror attack)

या घटनेनंतर लगेचच, मॉस्कोच्या पश्चिमेकडील क्रास्नोगोर्स्कमधील 6,000 हून अधिक लोकांची क्षमता असलेल्या क्रोकस सिटी हॉल, शॉपिंग मॉल आणि संगीत स्थळांच्याबाहेर आपत्कालीन वाहने तैनात करण्यात आली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अत्यंत नियोजनबद्ध सत्तेवर आपली पकड मजबूत केल्यानंतर काही दिवसांनी हा हल्ला झाला आहे. दरम्यान रशिया युक्रेन यांच्यातील संघर्ष दोन वर्षांपासून सुरू असून दरम्यान हा संघर्ष तिसऱ्या वर्ष सुरू होतानाच रशियावर हा प्राणघातक हल्ला झाला आहे.

हेही वाचा:

 

Back to top button