Dating app Bumble layoffs | ‘या’ डेटिंग ॲपने दिला ३५० जणांना नारळ, जाणून घ्या कारण

Dating app Bumble layoffs | ‘या’ डेटिंग ॲपने दिला ३५० जणांना नारळ, जाणून घ्या कारण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : टेक कंपन्यांनतर आता एका ऑनलाइन डेटिंग ॲपने नोकरकपातीची घोषणा केली आहे. अमेरिकेतील ऑनलाईन डेटिंग ॲप बंबलने ३५० नोकऱ्या कमी करणार असल्याचे म्हटले आहे. कमी कमाई आणि महसुलाबद्दल चिंता व्यक्त करत बंबलने नोकरकपातीचा जाहीर केला आहे. (Dating app Bumble layoffs)

बंबल हे एक लोकप्रिय डेटिंग ॲप असले तरी त्यांच्या लोकप्रियतेची कमाईला मदत झालेली नाही. त्यामुळे कंपनीने नोकरकपात जाहीर केली आहे. बंबलने उघड केले आहे की नोकरकपातीचा ३५० कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. एका अहवालानुसार, बंबल, बडू आणि फ्रूट्झच्या कंपनीचे मूल्य ७ टक्क्यांहून अधिक घसरले आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, नवीन बंबल सीईओ लिडियन जोन्स, कंपनीच्या महसुलाबाबतच्या समस्यांना तोंड देण्यासाठी निर्णय घेत आहेत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, ते अपेक्षेइतके पैसे कमवू शकत नाहीत. बंबलने जाहीर केले आहे की ते सुमारे ३५० नोकऱ्या कमी करणार आहेत. या वृत्तानंतर त्यांचा शेअर्स नियमित ट्रेडिंग तासांनंतर ७ टक्क्यांहून अधिक घसरला.

कंपनीला असे वाटते की या नोकरकपातीमुळे त्यांचा खर्च सुमारे २० दशलक्ष डॉलर ते २५ दशलक्ष डॉलरदरम्यान राहील. सीईओ जोन्स यांनी त्यांचे मुख्य ॲप अधिक चांगले बनवून आणि त्याच्या सशुल्क व्हर्जनमध्ये अधिक फीचर्स जोडून बंबलमध्ये सुधारणा करण्याची योजना आखली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बंबलला अधिक पैसे कमविण्याचे मार्ग शोधणे आणि नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करणे आवश्यक आहे.

जरी बंबलला दरवर्षी ८ ते ११ टक्के वाढ होण्याची आशा असली तरीही काही तज्ज्ञांनी, त्यांची वाढ मंदावली असल्याचे म्हटले आहे. या तिमाहीत त्यांचा अपेक्षित महसूल विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा कमी राहिला आहे.

गेल्या वर्षी बंबल ॲप्ससाठी अधिक लोकांना पैसे दिले. त्यांच्या यूजर्सची संख्या ३४ लाखांवरून ते ४० लाखांवर गेली होती. पण तरीही शेवटच्या तिमाहीत त्यांना अपेक्षेइतके महसूल मिळालेला नाही. (Dating app Bumble layoffs)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news