पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस चिघळत असतानाच पॅलेस्टाईनचे पंतप्रधान मोहम्मद शतायेह यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. पॅलेस्टाईनचे प्रशासन वेस्ट बँकेच्या काही भागावर पॅलेस्टाईनच्या सरकारचा ताबा आहे.
मोहम्मद म्हणाले, "वेस्ट बँक, जेरुसलेम येथेही संघर्ष उद्वभवू लागला आहे. गाझात वंशसंहार सुरू आहे, आणि तिथे लोक भुकेने मरत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेत मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे." मोहम्मद यांनी त्यांचा राजीनामा पॅलेस्टाईन अॅथॉरिटीचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याकडे सोपवला आहे.
मोहम्मद म्हणाले, "गाझातील परिस्थिती आता पूर्ण बदलेली आहे. नवीन स्थिती लक्षात घेत नवी राजकीय व्यवस्था उभी करावी लागेल आणि नवीन प्रशासनही द्यावे लागेल. पॅलेस्टाईनचे ऐक्य, पॅलेस्टाईनचे एकमत आणि पूर्ण पॅलेस्टाईनच्या भूमीवर अधिकार या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल."