महत्त्‍वपूर्ण निर्णय : ब्रिटनमधील शाळांमध्ये मोबाईल फोनवर बंदी : पंतप्रधान सुनक यांची घाेषणा | पुढारी

महत्त्‍वपूर्ण निर्णय : ब्रिटनमधील शाळांमध्ये मोबाईल फोनवर बंदी : पंतप्रधान सुनक यांची घाेषणा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मोबाईल फोनचे व्‍यसन आणि त्‍यामुळे निर्माण झालेल्‍या समस्‍या, ही आज जगासमोरील एक मोठा प्रश्‍न बनला आहे. या समस्‍येमध्‍ये सर्वाधिक नुकसान हे मुलांचे होत आहे. याचा विचार करुन ब्रिटनने शाळांमध्‍ये मोबाईल फोनवर बंद घालण्‍याचा महत्त्‍वपूर्ण निर्णय घेतला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी X वर ( पूर्वीचे ट्विटर ) एक व्हिडिओ शेअर करून या महत्त्‍वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे. ( UK PM Rishi Sunak Bans Mobile Phones Across England Schools )

ऋषी सुनक यांनी शेअर केलेल्‍या व्हिडिओमध्‍ये त्यांचा फोन पुन्हा पुन्हा वाजत असल्याचे दिसते. मोबाईल फोनमुळे वर्गात कशा समस्या निर्माण होतात हे त्‍यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ते संवाद साधण्‍याचा प्रयत्‍न करतात तेव्‍हा वारंवार त्‍यांच्‍या मोबाईल फोनची रिंग वाजते. फोन तीन वेळा वाजल्यानंतर ऋषी सुनक खिशातून फोन काढतात आणि बाजूला ठेवतात. यानंतर संदेश देतात की, “वारंवार येणारा व्‍यत्‍यय किती निराशाजनक आहे.”

मोबाईल बंदीसाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी

एका सर्वेक्षणात ब्रिटनमधील माध्यमिक शाळेतील सुमारे एक तृतीयांश विद्यार्थ्यांनी सांगितले होते की, मोबाईल फोनमुळे त्यांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. मोबाइल फोन वर्गात लक्ष विचलित करतात. तसेच शाळांमध्ये काही मुले हिंसाचारासही प्रवृत्त होतात. अनेक शाळांनी त्यांच्यावर आधीच बंदी घातली आहे, ज्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि चांगले शिक्षण वातावरण निर्माण झाले आहे. शाळांमध्ये मोबाईल बंदीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत.

हेही वाचा :

Rohit Sharma Insta Story : ‘ही आजकालची पोरं…’, राजकोट कसोटी विजयानंतर रोहित शर्माची इन्स्टा स्टोरी व्हायरल

 

Back to top button