कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : धनंजय महाडिकांनी घेतली जनता दल नगरसेवकांची भेट | पुढारी

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : धनंजय महाडिकांनी घेतली जनता दल नगरसेवकांची भेट

गडहिंग्लज ः पुढारी वृत्तसेवा

माजी खा. धनंजय महाडिक ( विधान परिषद निवडणूक ) यांनी गुरुवारी जनता दलाच्या पाच नगरसेवकांच्या गाठीभेटी घेऊन आपल्यासोबत येण्याची विनंती केली. ना. पाटील यांना पाठिंबा देताना जनता दलाच्या गैरहजर असलेल्या नगरसेविका क्रांती शिवणे यांच्या घरी जाऊन महाडिक यांनी त्यांचे पती आप्पा शिवणे यांची भेट घेतली. शिवणे यांनी महाडिकांना पाठिंबा देत त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने जनता दलाच्या पंधरा पैकी एक मत आज महाडिकांच्या पारड्यात गेले.

यानंतर महाडिकांनी भाजपकडून ( विधान परिषद निवडणूक ) निवडून आलेल्या मात्र जनता दलात प्रवेश केलेल्या शशिकला पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली.पाटील यांच्याच घरी महाडिक यांचे कट्टर कार्यकर्ते अमोल हातरोटे यांना भेटीसाठी बोलावण्यात आले. हातरोटे यांच्या पत्नी शकुंतला या जनता दलाच्या नगरसेविका आहेत. याबरोबरच नितीन देसाई व नरेंद्र भद्रापूर या जनता दलाच्या प्रमुख नगरसेवकांची भेट घेऊन आपल्यासोबत येण्याची गळ घातली.

‘जनसुराज्य’चे सर्व मतदार अमल महाडिकांच्या पाठीशी : शिवाजीराव मोरे ( विधान परिषद निवडणूक )

वारणानगर : पुढारी वृत्तसेवा
जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असतो. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या पाठीशी जनसुराज्य शक्तीचे सर्व मतदार राहतील, अशी माहिती जिल्हा परिषदेतील जनसुराज्य पक्षाचे पक्षप्रतोद शिवाजीराव मोरे यांनी गुरुवारी दिली.

भाजपबरोबर जनसुराज्य शक्ती पक्ष आहे. अमल महाडिक यांना उमेदवारी मिळण्यापूर्वी भाजपबरोबर असल्याचे डॉ. कोरे यांनी जाहीर केले होते. भाजपबरोबरच्या सर्व बैठकांना डॉ. कोरे हजर होते. जनसुराज्यचे 27 मतदार असून सर्व मतदार अमल महाडिक यांच्याच पाठीशी राहणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

Back to top button