Rio de Janeiro : डोक्यात गोळी लागूनही अनेक दिवस पार्टीत दंग | पुढारी

Rio de Janeiro : डोक्यात गोळी लागूनही अनेक दिवस पार्टीत दंग

रिओ दि जानीरो : डोक्यात गोळी लागूनही गेल्या काही दिवसांपासून तो पार्ट्या करतोय. असे सांगितले तर कोणाचाच त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र, ब्राझीलमध्ये खरोखरच अशी धक्कादायक घटना घडली आहे. तेथे मॅटुअस फॅसिओ या २१ वर्षीय तरुणाच्या डोक्यात गोळी गेली. (Rio de Janeiro)

मात्र, त्याला किरकोळ त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याने याकडे फार लक्ष दिले नाही. नंतर जेव्हा डोके जड होऊ लागले तेव्हा त्याने लगेच डॉक्टरांकडे धाव घेतली. एक्स-रेमध्ये त्याच्या डोक्यात गोळी घुसल्याचे दिसल्यानंतर डॉक्टरही थक्के झाले. यानंतर सुमारे दोन तास शस्त्रक्रिया करून नऊ मि.मी. लांबीची गोळी त्याच्या डोक्यातून काढण्यात आली. आता त्याची प्रकृती उत्तम आहे. अर्थात, त्या दिवशी गोळीबार कोणी केला व गोळी त्याच्या डोक्यात कशी घुसली यामागील गूढ अजून कायम आहे.

संबंधित बातम्या
Back to top button