तैवानच्‍या मतदारांनी चीनची ‘दहशत’ झुगारली! सत्ताधारी ‘डीपीपी’ पुन्‍हा विजयी | पुढारी

तैवानच्‍या मतदारांनी चीनची 'दहशत' झुगारली! सत्ताधारी 'डीपीपी' पुन्‍हा विजयी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तैवानला आपल्‍या दहशतखाली ठेवण्‍याचे चीनचे स्‍वप्‍न पुन्‍हा एकदा धुळीला मिळाले आहे. येथील मतदारांनी शनिवारी सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (डीपीपी) अध्यक्षपदाचे उमेदवार लाइ चिंग-ते यांच्‍याकडेच पुन्‍हा एकदा सत्ता दिली आहे, असे वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे. ( Taiwan Election : voters hand ruling party a third presidential win term ) लाइ चिंग-ते यांना ४१ टक्‍के मते मिळाली. तर त्‍यांचे दोन मुख्य प्रतिस्पर्धी अनुक्रमे ३३ आणि २६ टक्के मतांनी पिछाडीवर राहिले आहेत.

तैवान हे चीनच्‍या अग्‍नेय समुद्र किनार्‍याजवळ असणारे बेट आहे. तैवान स्वत:ला एक स्वतंत्र राष्ट्र मानतो. त्यांची स्वत:ची घटना आहे आणि येथील जनतेने निवडून दिलेल्या नेत्यांचं सरकार आहे.  तैवान हा आमचाच प्रांत आहे. एक दिवशी तो चीनचा भाग होणार आहे, असा दावा चीन करत आहे. लाइ चिंग-ते यांना मतदान करु नये, असा धमकी वजा इशारा चीनने दिला होता. तैवानच्‍या जनतेने या धमकीला भीक न घालात पुन्‍हा एकदा सत्तााधारी लाइ यांना विजयी केली आहे. लाई याने चीनचा वर्चस्‍ववादला तीव्र विरोध केला आहे. ते सलग तिसर्‍यांदा देशाचे अध्‍यक्ष होण्‍यासाठी सज्‍ज झाले आहेत. ( Taiwan Election : voters hand ruling party a third presidential win term )

तैवानचे विद्यमान उपाध्यक्ष लाय चिंग-ते निवडणुकीत विजयी झाल्‍याचे शनिवारी सायंकाळी घोषित करण्‍यात आले. तर त्यांच्या दोन प्रमुख विरोधी प्रतिस्पर्ध्यांनी पराभव मान्‍य केला. तैवानच्या सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने शनिवारी ऐतिहासिक सलग तिसर्‍या अध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीत बाजी मारली आहे.

Taiwan Election : ‘ तैवानच्‍या जनतेने लोकशाहीतील नवा अध्‍याय लिहिला’

तैवानच्‍या लोकशाहीच्‍या इतिहासातील हा एक नवा अध्याय लिहिल्याबद्दल मला तैवानच्या लोकांचे आभार मानायचे आहेत. आपण आपल्या लोकशाहीची किती आदर करतो हे जगाला दाखवून दिले आहे. ही आमची अटूट बांधिलकी आहे, अशा शब्‍दांमध्‍ये लाई चिंग-ते यांनी माध्‍यमांशी बोलताना आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली. लोकशाही आणि हुकूमशाही यांच्यामध्ये आम्ही लोकशाहीच्या बाजूने उभे राहू. तैवान जगभरातील लोकशाहीच्या बरोबरीने चालत राहील, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

चीनचा सातत्‍याने तैवानवर दबाव

मागील काही वर्ष चीन सातत्‍याने तैवानवर दबाव आणत आहे. तसेच तैपईशी बहुतांश संपर्कही तोडला आहे. यालष्करी दबाव वाढवत तैवान सामुद्रधुनीला जगातील प्रमुख भू-राजकीय केंद्र बनवले आहे. चीनचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष तैवानला आपलाच भूभाग मानतो. तर तैवानमधील सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने (डीपीपी) वारंवार स्‍पष्‍ट केले आहे की, तैवान चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या अधीन नाही. देशाचे भवितव्‍य तैवानचे २३.५ दक्षलक्ष नागरिकच ठरवतील. आम्‍ही लोकशाहीचाच मार्गाने वाटचाल करणार आहोत.

Taiwan Election : बीजिंगसाठी धक्का

तैवानमधील सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (डीपीपी) अध्यक्षपदाचे उमेदवार लाइ चिंग-ते यांचा विजय हा चीनसाठी मोठा धक्‍का मानला जात आहे. तैवानने मागील काही वर्षांमध्‍ये अमेरिकेबरोबरील आपली मैत्री अधिक दृढ केली आहे. तैवानचा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय पाठीराखा अशी देशात अमेरिकेची ओळख झाली आहे. त्‍यामुळेच अमेरिकेने तैवानबद्दलचे आपले दीर्घकालीन धोरण कायम ठेवेल आहे. शनिवारी तैवानमधील निवडणुकीचा निकाल हा चीनसाठी मोठा धक्‍का मानला जात आहे. कारण २०१६ पासून या देशात चीनविरोधीच डीपीपीने राजकारणावरील आपले वर्चस्‍व कायम ठेवले आहे. आंतरराष्‍ट्रीय विश्‍लेषकांच्‍या मते, पुढील काही दिवसांमध्‍ये चीन आपली नाराजी दर्शवण्‍यासाठी तैवानवर आर्थिक अणि लष्‍करी दबाव वाढवू शकतो.

हेही वाचा :

Back to top button