Ecuador TV Studio Attack : इक्वाडोरमध्ये लाईव्ह टेलिकास्ट सुरु असताना टीव्ही स्टुडिओवर हल्ला | पुढारी

Ecuador TV Studio Attack : इक्वाडोरमध्ये लाईव्ह टेलिकास्ट सुरु असताना टीव्ही स्टुडिओवर हल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : इक्वाडोरमध्ये एका टीव्ही स्टुडिओच्या लाईव्ह प्रोग्रॅममध्ये अचानक काही बंदूकधारी घुसले. (Ecuador TV Studio Attack) त्यांनी लोकांना घाबरवणे आणि धमकावणे सुरु केले. ज्यावेळी ही घटना घडली होती, तेव्हा चॅनेल लाईव्ह कार्यक्रम सुरु होते. इक्वाडोरच्या टीव्ही स्टेशन TC च्या लाईव्ह प्रोग्रॅममध्ये शस्त्रे घेतलेली आणि चेहरा झाकलेल्या बंदुकधाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना फरशीवर झोपण्यासाठी सांगितले. यावेळी बंदुकीच्या गोळ्यांचाही आवाज ऐकू आला. (Ecuador TV Studio Attack)

संबंधित बातमी –

रिपोर्टनुसार, इक्वाडोरचे राष्ट्रीय पोलिस प्रमुखांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी सर्व चेहरा झाकलेल्या घुसखोऱ्यांना अटक केली आहे. १३ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस कमांडर सेसर जपाटा यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी बंदूकधाऱ्यांजवळ उपस्थित बंदूके आणि स्फोटके जप्त केले आहेत.

‘तर आम्ही बॉम्ब फेकू’

रिपोर्टनुसार, इक्वाडोरच्या पोर्ट सिटी गुआयाकिलमध्ये टीसी टेलीविजन नेटवर्कच्या सेटवर मंगळवारी १३ चेहरा झाकलेले लोक बंदूक घेऊन घुसले. त्यानंतर त्यांनी लाईव टीव्ही शोच्या दरम्यान सेटवरच उपस्थित लोकांना धमकावले. बंदुकधाऱ्यांनी धमकीही दिली की, सर्वांनी शांत राहा नाही तर आम्ही बॉम्ब फेकू.

 

Back to top button