video san diego freeway : हायवेवर पैशांनी भरलेल्या कंटेनरचा दरवाजा उघडला अन् नोटांचा पाऊसच पाऊस, लोकांनी अक्षरश: करोडो लुटल्याचा video व्हायरल | पुढारी

video san diego freeway : हायवेवर पैशांनी भरलेल्या कंटेनरचा दरवाजा उघडला अन् नोटांचा पाऊसच पाऊस, लोकांनी अक्षरश: करोडो लुटल्याचा video व्हायरल

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

video san diego freeway : अमेरिकेतील सॅन दिएगो हायवेवर बंद कंटेनरमधून अचानक नोटांचा पाऊस सुरू झाला. त्यानंतर रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनांची अचानक तारांबळ उडाली आणि पैसे गोळा करण्याची अक्षरश: स्पर्धा सुरू झाली. हातात मिळेल तेवढा पैसे लोकांनी गोळा केले तसेच आपल्या वाहनांमध्ये पैसे भरून लोकांनी तिथुन पलायन केले. दरम्यान अमेरिकन गुप्तचर यंत्रणा एफबीआयने लोकांना हे पैसे परत करण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर आता एफबीआय आणि कॅलिफोर्निया हायवे पोलिस पैसे घेऊन पळून गेलेल्यांचा शोध घेत आहेत.

video san diego freeway : एफबीआयकडून पैसे परत करण्याचे आवाहन

कॅलिफोर्निया हायवे पोलिसांनी माहितीनुसार, ज्या लोकांनी ही रक्कम घेतली असेल त्यांना आम्ही ती रक्कम व्हिस्टा कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करत आहोत. तसेच लोकांना विनंती आहे आमच्याकडे बरेच व्हिडिओ आणि पुरावे आहेत.

लोकांनी पुढील ४८ तासांत पैसे परत करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या गुन्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली असल्याचे अमेरिकन पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

फेडरल रिझर्व्ह बँकेचे पैसे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अचानक दरवाजा उघडला

अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा कंटेनर फेडरल रिझर्व्ह बँकेकडे मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन जात होता. या दरम्यान, कॅलिफोर्नियातील कार्ल्सबाडजवळील इंटरस्टेट-५ वर ट्रकचे मागील दरवाजे उघडले. आणि रस्त्यावर पैसेच पैसे पडायला सुरू झाले.

मात्र, या ट्रकमध्ये किती रक्कम ठेवण्यात आली होती आणि किती रक्कम गायब असल्याचे अद्याप समजू शकलेले नाही. एफबीआय आणि कॅलिफोर्निया हायवे पेट्रोलींग करणारे पोलिस अधिकारी पैसे गोळा करण्यासाठी शोध घेत आहेत.

लोक नोटा गोळा करतानाचा व्हिडीओ व्हायरल

फिटनेस संस्थेची एक महिला घटनास्थळी उपस्थित होती. तिने या घटनेचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

ज्यामध्ये ती हायवेवर पैसे गोळा करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तीचा मित्रही त्यांच्यासोबत पैसे घेताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये ती महिला म्हणते मी पाहिलेली ही सर्वात विलक्षण गोष्ट आहे, कोणीतरी रस्त्यावर पैसे टाकले आहेत.

यामुळे सॅन दिएगो रस्ता बंद झाला. ती पुढे म्हणाली देवा हा रस्ता एकदा पाहून घे.

पोलिसांनी अनेक फोटो प्रसिद्ध केली

या व्हिडिओमध्ये इतर अनेक लोकांच्या हातात नोटा दिसत होत्या. यासोबतच आणखी दोन महिलाही यात दिसत आहेत.

एफबीआयने त्या महिलेच्या व्हिडिओचे स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल केले आहेत.

घटनास्थळी असणाऱ्या लोकांशी आम्हाला बोलायचे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

१० वर्षे तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो

पोलिसांनी पडलेले पैसे कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये जमा केले. असे असतानाही आजूबाजूला उडालेल्या नोटांच्या शोधात मोठी गर्दी झाली होती. एफबीआयचे म्हणणे आहे की सरकारी मालमत्तेची चोरी करणे हा गुन्हा आहे. अशा परिस्थितीत लोकांनी न मागता पैसे परत करावेत. सरकारी मालमत्तेची चोरी केल्यास जास्तीत जास्त १० वर्षांचा तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by DEMI BAGBY (@demibagby)

Back to top button