जळगाव जिल्हा बँकेसाठी ९४.०८ टक्के मतदान | पुढारी

जळगाव जिल्हा बँकेसाठी ९४.०८ टक्के मतदान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा बँकेच्या १० संचालकांच्या निवडणूकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया जिल्ह्यात १५ तालुकास्तरावरील मतदान केंद्रांवर पार पडली. यात १० संचालक पदासाठी ४२ उमेदवार सोसायटी व अन्य मतदार संघातून निवडणूक रिंगणात होते. रविवार २१ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान प्रकियेदरम्यान सकाळी ११ वाजेपर्यत सरासरी सुमारे २४ टक्के, दुपारी १२ वाजेदरम्यान ५३, दुपारी २ वाजता ७८.४८ तर सायंकाळी ४ वाजेपर्यंत विकासो व इतर संस्थांच्या एकूण २८५३ मतदारांपैकी २६८४ मतदारांनी मतदान केले. सरासरीनुसार ९४.०८ % मतदारांनी मतदान केले असून आज सोमवार २१ रोजी सकाळी ८ वाजेपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मतमोजणी केली जाणार आहे.  निवडणूक रिंगणात असलेल्या सहकार व शेतकरी पॅनल मधील ४२ उमेदवारांमधून जिल्हा बँकेत निवडून येणार्‍यांच्या पाठबळावरच अध्यक्ष व उपाध्यक्ष पद कोण विराजमान होते, याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या १० संचालक पदांच्या ४२ उमेदवारांसाठी रविवार २१ रोजी १५ तालुकास्तरावर मतदान घेण्यात आले.  जळगाव शहरात सु.ग.देवकर प्राथमिक शाळेजवळ सकाळपासूनच मतदारांसह समर्थकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. या प्रक्रियेत माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आ. चंद्रकांत सोनवणे, माजी महापौर तथा शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे,  अन्य तालुकास्तरावर देखिल अशीच परिस्थिती सर्वदूर आढळून आली.

भुसावळ म्युनसिपल हायस्कूल, यावल जि.प.मराठी मुलींची शाळा, कमलाबाई अगरवाल हायस्कूल रावेर, जे.ई.हायस्कूल मुक्ताईनगर, जि.प.मुलींची शाळा बोदवड, न्यू इंग्लिश स्कूल जामनेर, गो.से.हायस्कूल पाचोरा, सु.गि.पाटील हायस्कूल भडगांव, एच.एच.पटेल प्राथ.विद्यालय चाळीसगाव, एन.ई.एस.हायस्कूल पारोळा, जी.एस.हायस्कूल अमळनेर, कस्तूरबा विद्यालय चोपडा, जि.प.शाळा धरणगांव, आर.टी.काबरे विद्यालय एरंडोल याठिकाणी जिल्हा बँकेच्या संचालकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा बँकेसाठी विकासो व इतर संस्थांचे मतदारांचे ९८.०८ टक्के मतदान झाले आहे.

मतदान केंद्र  एकूण मतदान     झालेले मतदान

जळगाव      ४००             ३६६
भुसावळ      १३९             १३४
यावल        ३३३             २९५
रावेर         ३००             २८२
मुक्ताईनगर   ७६                 ७६
बोदवड       ६०                 ५९
जामनेर       २०७             १८७
पाचोरा        १८३             १७२
भडगांव        १२८             १२७
चाळीसगांव    १८३              १७६
पारोळा        १९४              १८७
अमळनेर       १८६              १७८
चोपडा         २१६              २१४
धरणगांव        १३८              १३३
एरंडोल          ११०              १०४
एकूण            २८५३           २६८४ (९४.०८ टक्के)  मतदान झाले आहे.

मतदान टक्केवारी…

जळगाव मतदान केंद्रावर ९१.५० टक्के, भुसावळ ९६.४०, यावल ८८.५९, रावेर ९४, मुक्ताईनगर १००, बोदवड ९८.३३, जामनेर ९०.३४, पाचोरा ९३.९९, भडगाव ९९.२२, चाळीसगाव ९६.१७, पारोळा ९३.३०, अमळनेर ९५.७०, चोपडा ९९.०७, धरणगाव ९६.३८, एरंडोल ९४.५५ असे एकुण ९४.०८ टक्के मतदान झाले आहे.

जिल्हा बँकेच्या २१ संचालकांपैकी ११ संचालकांची माघारीअंती बिनविरोध निवड झाली आहे. तर उर्वरित १० संचालकांसाठी ४२ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात होते. त्यात १० उमेदवारांन अन्य उमेदवारांना पाठिंबा जाहिर केला होता. त्यामुळे ३१ उमेदवारंासाठी रविवारी जिल्ह्यातील तालुकास्तरावर १५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीसाठी ११७ कर्मचारी सहकार विभागाकडून नियुक्त करण्यात आले होते.

जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये महा विकास आघाडीच्या अकरा जागा बिनविरोध झाल्या आहेत त्यामुळे महा विकास आघाडीला बहुमत मिळाले आहे  आजची मतदानाची आकडेवारी पाहता महा विकास आघाडीच्या सहकाऱ्याला घवघवीत यश मिळेल यात काही शंका नाही विरोधकांचे कामच कुठेआहे आरोप करणे ज्यावेळेस आम्ही विरोधात होते त्यावेळेस आम्ही त्यांच्यावर आरोप लावत होते की त्यांनी सत्तेचा गैरवापर केला हे विरोधकांचे कामच आहे असे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Back to top button