file photo
Latest
Earthquake in Japan | जपानचा किनारी भाग भूकंपाने हादरला, रिश्टर स्केलवर ६.३ तीव्रता
पुढारी ऑनलाईन डेस्क : जपानच्या किनारी भागात गुरूवारी दुपारी एकापाठोपाठ एक असे भूकंपाचे सलग दोन धक्के बसले. पहिल्या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर तर दुसऱ्या भूकंपाची तीव्रता ५.० रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. (Earthquake in Japan)
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, जपानमधील कुरिल बेटांवर गुरुवारी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का नोंदवण्यात आला, तर दुसरा धक्का दुपारी ३ वाजून ७ मिनिटाच्या सुमारास नोंदवण्यात आला. (Earthquake in Japan)
Earthquake in Japan: गेल्या तीन दिवसांपासून भूकंपाची मालिका सुरूच
वृत्तानुसार, जपानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने भूकंप होत आहेत. यापूर्वी मंगळवारी २६ डिसेंबर आणि बुधवारी २७ डिसेंबरलाही जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. मंगळवारी २६ डिसेंबर रोजी जपानच्या इझू बेटावर आणि २७ डिसेंबर रोजी होक्काइडो येथे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

