चीननं असा डाव रचलाय ज्यामुळे अमेरिका जाग्यावर ठप्प झाली पाहिजे ! | पुढारी

चीननं असा डाव रचलाय ज्यामुळे अमेरिका जाग्यावर ठप्प झाली पाहिजे !

तैपेई / वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

तैवानला घेऊन अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांची शिखर परिषदे दरम्यान चर्चा झाली होती. यावेळी जिनपिंग यांनी अगदी कडक शब्दात तैवानला चीनमध्ये समाविष्ट करण्याबाबत भाष्य केले होते. चीनने अनेकवेळा अमेरिकेला धमक्या दिल्या आहेत. आता तैवान आणि अमेरिकेच्या तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, चीनी सेना अमेरिकेच्या सैन्य तळाचे कम्युनिकेशनला ठप्प करण्याचे नवे नवे मार्ग शोधत आहे. तज्ज्ञांच्या या इशाऱ्यानंतर जगभराच्या चिंतेत वाढ झाली आहे.

अमेरिकेच्या सैन्य तळाचा नेटवर्क जाम करण्याच्या तयारीत चीन

अमेरिकेचे सैन्य तज्ज्ञ डेविड रॅनसीमन हे एका पॉडकास्ट कार्यक्रमात म्हणाले, अमेरिकेच्या ठिकाणावरील कम्युनिकेशन जॅम केल्याने सैन्याला मोठे नुकसान सहन करावे लागेल. चीनने जर तैवान विरुद्ध युद्ध छेडले तर यामध्ये अमेरिका हस्तक्षेप करु नये यासाठी चीनी सैन्य वेगवेगळ्या प्रकराचे मार्ग शोधत आहे. चीनी सेना या प्रयत्नात आहे की अमेरिकेच्या सैन्यतळाची कम्युनिकेशन यंत्राना कशी ठप्प करता येईल.

प्रतिहल्ला देखिल करु शकणार नाही अमेरिका

रेविड रॅनसीमन यांनी सांगितले, जर चीनी सैन्याने हल्ला केला तर कम्युनिकेशन बंद असल्या कारणाने अमेरिका चीनवर प्रतिहल्ला देखिल करु शकणार नाही. आक्रमणाची सुचना अमेरिकेचा तैन्यतळाला मिळणार नाही. ज्यामुळे कोणत्याही कारवाई करणे अवघड आहे. चीनकडे अमेरिकेचे गुआम नौदल तळ आहे. या शिवाय अमेरिकेचे लांब पल्ल्याचे स्ट्रटर्जिक बॉम्बर डियागो गार्सिया हे देखिल ऑपरेट करु शकतात. दक्षिण कोरिया, जपान आणि तैवान मध्ये देखिल अमेरिकेचे सैन्यतळ आहेत जे चीनच्या खूप जवळ आहेत.

तैवानने चीन सीमेवर एफ – १६ लढाऊ विमाने तैनात केली

चीन सोबत वाढत्या तणावाला घेऊन तैवानने आपल्या आधुनिक एफ-१६ लढाऊ विमानांना सीमेवर तैनात केले आहे. ही विमाने अमेरिकेच्या एफ-१६ चे अपडेच व्हर्जन आहेत. ही लढाऊ विमाने तैनात केल्या वरती तैवानच्या वायु सेनेला बळ मिळाले आहे. तैवानच्या राष्ट्रपती त्साई-इंग-वेन यांनी गुरुवारी चियाई येथे एका वायुसेनेच्या तळावर ६४ अपग्रेटेड एफ-१६ व्ही लढाऊ विमानांना ताफ्यात सामिल करुन घेतले.

चीनच्या लढाऊ विमानांची तैवानमध्ये घुसखोरी

मागील १ ऑक्टोंबर रोजी म्हणजे चीनच्या राष्ट्रीय दिना दिवशी चीनी वायु सेनेचे २५ लढाऊ विमाने, बॉम्बर्स आणि दुसरे विमानांनी तैवानच्या वायुसीमेचे उल्लंघन केले. विशेष कहर म्हणजे याआधी चीन तब्बल ५६ विमानांनी एकावेळी तैवानच्या सीमेमध्ये प्रवेश केला. ही आता पर्यंतची तैवानमध्ये चीनी लढाऊ विमानांनी केलेली मोठी घुसखोरी होती. यावेळी तैवानच्या वायुसेनेच्या काही विमाने चीनच्या विमानांसमोर आली.

Back to top button