गाझातील शस्त्रसंधीचा ठराव अमेरिकेने रोखला; UNच्या सुरक्षा परिषदेत वापरला नकाराधिकार | US Vetoes Gaza Ceasefire Resolution
पुढारी ऑनलाईन डेस्क : संयुक्त राष्ट्रांनी गाझात शस्त्रसंधीसाठी आणलेला ठराव अमेरिकेने नकाराधिकार वापरून रोखला आहे. या ठरावाविरोधात मतदान करणारे अमेरिका हे एकमेव राष्ट्र आहे. तर दुसरीकडे इस्रायलने गाझा पट्टीतील कारवाई अधिक तीव्र केली आहे.
या संघर्षात पॅलेस्टाईनमध्ये आतापर्यंत १७,४८७ लोक मारले गेले आहेत, यात महिला आणि मुलांची संख्या मोठी आहे. (US Vetoes UN Resolution On Gaza Ceasefire)
हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर क्षेपणास्त्र डागले होते. यात १२०० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेकांना हमासने बंधक बनवले. काही बंधक नागरिकांची सुटका करण्यात आली असून १३८ लोक हमासच्या कैदेत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार गाझा पट्टीतील ८० टक्के लोक विस्थापित झाले आहेत तर अन्न, पाणी, औषधे, इंधन यांचा मोठा तुडवडा निर्माण झाला आहे. गाझात रोगराई पसरण्याचा मोठा धोकाही निर्माण झाला आहे. (US Vetoes UN Resolution On Gaza Ceasefire)
संयुक्त राष्ट्रांची भूमिका | US Vetoes UN Resolution On Gaza Ceasefire
गाझातील स्थिती चिघळलेली असताना संयुक्त राष्ट्रांनी कलम ९९चा वापर करत सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलवली. गाझात शस्त्रसंधी करण्यात यावी आणि सर्व बंधकांची सुटका व्हावी, असा ठराव सुरक्षा परिषदेत मांडण्यात आला पण इस्रायलला नेहमी मदत करत असलेल्या अमेरिकेने या ठरावाच्या विरोधात नकाराधिकार वापरला. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस म्हणाले, "हमासने जे अमावनी कृत्य केले आहे, त्याची एकत्रित शिक्षा पॅलेस्टाईनच्या नागरिकांना देता येणार नाही."
हेही वाचा

