जळगाव : खडसेंवर आरोप केल्याप्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक; गिरीश महाजन यांच्या प्रतिमेस काळे फासून निषेध | पुढारी

जळगाव : खडसेंवर आरोप केल्याप्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक; गिरीश महाजन यांच्या प्रतिमेस काळे फासून निषेध

जळगाव; पुढारी वृत्तसेवा :  जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज (दि. २३) आमदार एकनाथ खडसे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नामदार गिरीश महाजन यांच्या प्रतिमेस काळे फासून व चपला मारून निषेध व्यक्त केला.

167 कोटीची नोटीस आल्यामुळे खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी आजारी असल्याचे नाटक केल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर केला होता. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महानगरकडून गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला काळे पासून जोडे मारण्यात आले.

या वेळी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक जिल्हाध्यक्ष् उमेश पाटील, युवक महानगराध्यक्ष रिकु चौधरी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण,आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष् इब्राहिम तडवी सर,,सामाजिक न्याय महानगराध्यक्ष रमेश बाऱ्हे, जिल्हा सरचिटणीस सुनील माळी तसेच राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button