अमेरिका : ५० वर्षांपूर्वी महिलांनी ‘ब्रा’ काढून हवेत भिरकावल्या होत्या!

अमेरिकेत ५० वर्षांपूर्वी महिलांनी 'ब्रा' जाळल्या होत्या का?
अमेरिकेत ५० वर्षांपूर्वी महिलांनी 'ब्रा' जाळल्या होत्या का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री हेमांगी कवीने 'बाई, बुब्ज आणि ब्रा' या विषयावर आपलं सडेतोड मत सोशल मीडियावर मांडलं. त्यानंतर स्रिया स्त्रियांच्या अंतवस्त्रांवरील चर्चेची ठिणगी पडली. ती प्रचंड ट्रोल झाली आणि तिला पाठिंबाही खूप मिळाला. अमेरिका देशात महिलांच्या अंतवस्त्रांसंदर्भात ५० वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती. त्याबद्दल जाणून घेऊया…

'बाई, बुब्ज आणि ब्रा' या विषयावर ५० वर्षांपूर्वी न्यू जर्सीमध्ये 'मिस अमेरिका सौंदर्य स्पर्धे'च्या विरोधात असंख्य महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यांनी समुहा-समुहाने कचरा कुंडीमध्ये सौंदर्य प्रसाधने म्हणजेच लिपस्टिक्स, उंच टाचेच्या चपला फेकून देत निषेध व्यक्त केला होता.

ज्या वस्तू महिलांवर अत्याचार करणाऱ्या असतात त्या फेकून देणे, अशी संकल्पना या आंदोलनामागे होती. यामध्ये रस्त्यावरील अनेक प्रवाशांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावं, असं आवाहनही करण्यात आलं होतं.

या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या एम. एस. माॅर्गन या आठवण सांगतात की, "या आंदोलनात एका तरुणींने आपल्या शर्टच्या आतून सहज 'ब्रा' काढली आणि सर्वांदेखत मोठ्या आनंदाने ती भिरकावून दिली होती. तिच्या ही कृतीने या आंदोलनाल इतिहास मिळवून दिला."

<strong>अमेरिका : ५० वर्षांपूर्वी महिलांनी 'ब्रा' काढून हवेत भिरकावल्या होत्या!</strong>
अमेरिका : ५० वर्षांपूर्वी महिलांनी 'ब्रा' काढून हवेत भिरकावल्या होत्या!

माॅर्गेन पुढे सांगतात की, "असं आंदोलन यापूर्वी कधीही झालेलं नव्हतं. आम्ही या आंदोलनावेळी कट्टर झालो होतो. आम्ही स्त्रीवाद सुरू केलेला होता. कारण, पुरूषांबरोबर धोरणं ठरविण्यात कुठेच नव्हतो आणि घरात स्त्रियांची कामं करून कंटाळलो होतो. स्त्रीला स्वतः असं वाटू लागलं होतं की, आपण स्वतःहून यातून बाहेर पडलं पाहिजे."

"आम्हा सर्व महिलांना हे माहिती होतं की, पुरुष हक्क हे आमच्यासाठी नाहीत. आम्हाला वाटलं की, आमचे भाऊ आमच्या हक्कांसाठी लढतील. पण, तसं झालं नाही ", असंही माॅर्गन यांनी सांगितलं.

काही स्त्रीवादी इतिहासकारांनी ५० वर्षांपूर्वी झालेल्या या आंदोलनाला 'स्त्रीवाद'ची खरी सुरुवात होती, अशी नोंद केलेली आहे. आज जो स्त्रीवादाची लाट आपल्याला पाहायला मिळाते, त्याची सुरूवात या आंदोलनात आपल्याला सापडते.

"५० वर्षांपूर्वी या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांची प्रतिमा ही 'ब्रा-बर्निंग फेमिनिस्ट', अशी करण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात त्या आंदोलनात असं काही झालंच नव्हतं. या आंदोलनामधील काही स्त्रियांनी आपली अंतवस्त्रं अर्थात ब्रा कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली होती. पण, ब्रा जाळल्या नव्हत्या", असंही माॅर्गन सांगतात.

आता आंदोलनातील महिलांनी ब्रा जाळल्या की नाही, यावर विसंगती आढळते. स्थानिक पत्रकार असं सांगतात. महिलांनी ब्रा जाळल्या होत्या. ती आग मोठी नव्हती आणि लवकर विझविण्यात आली. पण माॅर्गन… या आगीची घटना घडली नाही. यावरच ठाम आहेत. या आंदोलनात महिलांनी ब्रा जाळल्या, हे वर्षानुवर्षे चालत आलेलं मिथक आहे.

१९६८ मध्ये 'मिस अमेरिका' या सौंदर्य स्पर्धेत विशिष्ठ प्रकारच्या सौंदर्य असणाऱ्या स्त्रीला बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेत वंशवादावरून जज करण्यात येऊ नये, अशी साधारण अपेक्षा होती. पण, १९२१ मध्ये मिस अमेरिकेची सुरूवात झाल्यापासून या स्पर्धेत फायनलिस्टमध्ये कृष्णवर्णीय स्त्री आलेली नव्हती.

थोडक्यात काय? तर स्पर्धेमध्ये निकाल देताना भेदभाव केला जात असे. हे आंदोलन ज्या मुद्द्यांना घेऊन करण्यात आले होते, त्यामध्ये 'वंशवाद' हादेखील महत्वाचा मुद्दा होता.

माॅर्गन म्हणतात की, "आता या आंदोलनाकडे सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टीने पाहिजे जाते. पण, मागे वळून पाहिले की, आता त्याच गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळतात. आम्ही या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला स्पर्धकांचा निषेध व्यक्त केला होता."

<strong>'मिस अमेरिका 'ठरलेल्या जुडीथ फोर्ड</strong>
'मिस अमेरिका 'ठरलेल्या जुडीथ फोर्ड

अमेरिका देशात विशेष करून नोकरी करणाऱ्या महिला विशेष फ्री-स्काॅलरशीप मिळावी म्हणून महिला या स्पर्धेत भाग घेत होत्या. त्या वर्षी १८ वर्ष असणाऱ्या जुडीथ फोर्ड (जुडीथ नॅश) हिने ती स्पर्धा जिंकेली होती. "या स्पर्धा सर्वांसाठी नसतात हे मला माहीत आहे", असं मिस जुडीद नॅश यांनी एका मॅगजिनला दिलेल्या मुलाखतीत म्हंटलं होतं.

नॅश पुढे सांगतात की, "त्यावेळी काही लोकांना मला सांगितले होते की, मिस अमेरिकन स्पर्धा ही अंगप्रदर्शन करणारी आणि महिलांचं शोषण करणारी आहे. पण, मिस अमेरिकन स्पर्धेचं ध्येय असं होतं की, महिलांना प्रोत्साहन देणं, त्यांना स्काॅलरशीप देणं आणि त्यांच्यासाठी विविध संधी उपलब्ध करून देणं. जे इतर स्पर्धांमध्ये महिलांना मिळणार नव्हतं."

'शारिरिक शिक्षण' या विषयात घेत असलेल्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी मिस अमेरिकन सौंदर्य स्पर्धेत प्राईज देण्यात आलं होतं. त्यामुळे माझ्यासाठी ही स्पर्धा अत्यंत फायद्याची ठरली", असं जुडीद नॅश यांनी सांगितलं.

"अमेरिकेत ५० वर्षांनंतर अमेरिकेतील प्रसार माध्यमांमध्ये 'महिलांचे हक्क' हा मुद्दा पुन्हा उच्च स्थानावर आहे. महिलांसाठी काढलेले मोर्चे आणि मीटू चळवळ असेल, या आंदोलनांनी मुख्य बातम्यांचा जागा पटकावल्या. आज अमेरिकेतल्या ५० राज्यांमध्ये महिला निवडणुकांमध्ये उभ्या राहतात, हा एक चांगला रेकाॅर्ड आहे", असं माॅर्गन म्हणतात.

माॅर्गन पुढे सांगतात की, "यापूर्वी महिला या कधीत राजकारणात नव्हत्या. आता त्याच महिला होममेकर, शिक्षिका, कॅशिअर आणि बॅगर्स, अशा कोणत्या क्षेत्रांमध्ये जायचं. याबाबतीत महिला निर्णय घेताहेत. मी मूळची कवी आहे. त्यामुळे प्रतिकं आणि रुपकं, कशी वापरायची, याची शक्ती मला या आंदोलनातून मिळाली", असं मोर्गन सांगतात.

पहा व्हिडिओ : मेन्स्ट्रुइस कर, समज-गैरसमज नम्रता भिंगार्डेशी खास गप्पा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news