Malayalam TV actress Dr Priya dies | मल्याळम अभिनेत्री डॉ. प्रिया यांचे हार्ट अटॅकने निधन, ८ महिन्यांची होती गर्भवती

Malayalam TV actress Dr Priya dies | मल्याळम अभिनेत्री डॉ. प्रिया यांचे हार्ट अटॅकने निधन, ८ महिन्यांची होती गर्भवती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : मल्याळम टीव्ही अभिनेत्री डॉ. प्रिया हिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 'करुथमुथू' सारख्या अनेक मल्याळम टेलिव्हिजन शोमध्ये तिची भूमिका होती. डॉ. प्रिया आठ महिन्यांची गरोदर होती आणि तिच्या नवजात बाळाला सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. अभिनेता किशोर सत्या यांनी ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर दिली आहे. (Malayalam TV actress Dr Priya dies)

डॉ. प्रिया यांचे ३१ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अभिनेता किशोर सत्या यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मल्याळम टेलिव्हिजन क्षेत्रात आणखी एक अनपेक्षित मृत्यू. प्रिया यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ती ८ महिन्यांची गर्भवती होती. बाळ आयसीयूमध्ये आहे. त्यांना आरोग्याचा इतर कोणतीही त्रास नव्हता."

त्यांनी पुढे म्हटले, "एक आई रडत आहे जिच्या एकुलत्या एक मुलीचा मृत्यू झाला आहे यावर तिचा विश्वास बसत नाही. ६ महिने कुठेही न जाता प्रियाची काळजी घेणारा तिचा प्रेमळ जोडीदार पती नन्नाला दुःख झाले आहे. काल रात्री हॉस्पिटलमध्ये जात असताना माझ्या मनालाही खूप दुःख झाले."

शेवटी तो म्हणतो की, "त्यांचे सांत्वन तुम्ही कसे करणार? देव त्यांच्याबाबतीत असा कसा क्रूर होऊ शकतो जे आस्तिक आहेत? मनात पुन्हा तोच तोच प्रश्न घोळत राहतो … ज्याचे उत्तर नाही… अभिनेत्री रंजूषाच्या मृत्यूच्या धक्कादायक बातमीनंतर आणखी एक दुःखदायक घटना… अवघ्या ३५ वर्षांची व्यक्ती जेव्हा हे जग सोडून जाते, तेव्हा यावर विश्वास बसत नाही….प्रियाचा नवरा आणि आई या धक्क्यातून कसे सावरतील…सांगू शकत नाही…दुःखातून सावरण्यासाठी देवा त्यांना शक्ती दे."

मल्याळम मनोरंजन क्षेत्राला बसलेला हा दुसरा धक्का आहे. नुकतीच मल्याळम चित्रपट- टीव्ही अभिनेत्री रेंजुषा मेनन तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. ३५ वर्षीय या अभिनेत्रीने मालिका आणि सिनेमात येण्यापूर्वी टीव्ही शो अँकर म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. एका प्रसिद्ध मल्याळम वाहिनीवरील सेलिब्रिटी टीव्ही शोमध्ये स्पर्धक म्हणून तिला प्रथम ओळख मिळाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kishor Satya (@kishor.satya)

"

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news