Hurricane Otis : ओटीस चक्रीवादळाचा मेक्सिकोला तडाखा; २७ जणांचा मृत्यू | पुढारी

Hurricane Otis : ओटीस चक्रीवादळाचा मेक्सिकोला तडाखा; २७ जणांचा मृत्यू

मेक्सिको सिटी : वृत्तसंस्था : मेक्सिकोच्या पॅसिफिक किनाऱ्यावर आदळलेल्या ओटीस (हरिकेन) या चक्रीवादळामुळे २७ जणांचा मृत्यू अनेक बेपत्ता झाले आहेत. वादळामुळे घरांचे मोठे नुकसान झाले असून, हजारो लोक मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे मेक्सिको सरकारने सांगितले. (Hurricane Otis)

पॅसिफिक किनाऱ्यावरील अकापुल्को शहराला चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला असून, वीजपुरवठा ठप्प झाला असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युअल लोपेझ यांनी सांगितले. चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडला असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली असून, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असल्याने वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली आहे. वादळाचा सार्वजनिक मालमत्तेलाही जोरदार फटका बसला आहे. मदतीसाठी सुमारे दहा हजार सैनिक अकापुल्को शहरात तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा 

Back to top button