Sherika De Armas: माजी ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धक शेरीका हिचे वयाच्या २६ व्या वर्षी कर्करोगाने निधन | पुढारी

Sherika De Armas: माजी 'मिस वर्ल्ड' स्पर्धक शेरीका हिचे वयाच्या २६ व्या वर्षी कर्करोगाने निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क: माजी मिस वर्ल्ड स्पर्धक शेरीका डी अरमास हिचे वयाच्या २६ व्या वर्षी निधन झाले. शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी तिची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. गर्भाशयाच्या कर्करोगाने तिची वयाच्या केवळ २६ व्या वर्षी प्राणज्योत मावळली. तिने २०१५ च्या मिस वर्ल्ड स्पर्धेत उरुग्वेचे प्रतिनिधित्व केले होते. एवढ्या कमी वयात या मिस वर्ल्डचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Sherika De Armas)

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, शेरीका दोन वर्षांपासून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने ग्रस्त होती. तिच्यावर केमोथेरपी आणि रेडिओथेरपीचे उपचारही सुरू होते. मात्र उपचारादरम्यान तिचे निधन झाले. शेरीका डी अरमासचा हिचा भाऊ मायाक डी अरमास याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने आपल्या बहिणीला “मी माझ्या आयुष्यात भेटलेल्या सर्वात सुंदर स्त्रियांपैकी ती एक होती”, असे म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे. (Sherika De Armas)

मिस उरुग्वे २०२१ च्या लोला डे लॉस सँटोस यांनी शेरीका हिला श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे की, मला नेहमी तुझी आठवण येईल. फक्त तू मला दिलेल्या सर्व पाठिंब्यासाठीच नाही, तर तुझ्या स्नेहासाठी, तुझा आनंदासाठी तु नेहमी स्मरणात राहशिल. तुझ्यामुळे जोडले गेलेले मित्र अजूनही माझ्यासोबत आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. Sherika De Armas हिच्या निधनामुळे तिच्या चाहत्यांना आणि जगभरातील विविध क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे. (Sherika De Armas)

हेही वाचा:

Back to top button