71st Miss World 2023 : 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा ‘या’वर्षाच्या अखेरीस काश्मीरमध्ये होणार | पुढारी

71st Miss World 2023 : 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा 'या'वर्षाच्या अखेरीस काश्मीरमध्ये होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ७१ वी मिस वर्ल्ड २०२३ ही स्पर्धा या वर्षाच्या अखेरीस काश्मीरमध्ये होणार आहे. स्पर्धेत १४० देश सहभागी होतील. मंगळवारी श्रीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. (71st Miss World 2023) पत्रकार परिषदेत मिस वर्ल्ड, कॅरोलिना बिलावस्की, मिस इंडिया, सिनी शेट्टी, मिस वर्ल्ड कॅरेबियन, एमी पेना आणि मिस वर्ल्ड इंग्लंड जेसिका गेगन तसेच मिस वर्ल्ड अमेरिका श्री सैनी आणि मिस एशिया प्रिसिलिया कार्ला सपुत्री युल्स हे उपस्थित होते. (71st Miss World 2023)

मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्काने दिली नंदनवन काश्मीरला भेट

मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्का सोमवारी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काश्मीरला आली होती. त्यावेळी श्रीनगर विमानतळावर तिचे भव्य स्वागत करण्यात आलं. तिच्यासोबत इतर अनेक परदेशी पाहुणेही काश्मीर दौऱ्यावर आले होते. यावेळी तिच्यासोबत मिस वर्ल्ड इंडिया सिनी शेट्टी, मिस वर्ल्ड अमेरिका श्री सैनी आणि मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या चेअरपर्सन आणि सीईओ ज्युलिया मोर्ले उपस्थित होत्या. जवळपास तीन दशकांनंतर या स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी भारताला मिळालीय.

भारतात तब्बल २७ वर्षानंतर ७१ व्या मिस वर्ल्ड २०२३ (Miss World 2023) स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. भारतात याआधी १९९६ मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा झाली होती. यंदाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेत मिस इंडिया वर्ल्ड २०२२ ची विजेती सिनी शेट्टी भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

७१ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत (71st Miss World 2023) १३० देशांच्या स्पर्धक त्यांच्या एका महिन्याच्या अतुल्य भारतातील प्रवासात त्यांची कामगिरी सिद्ध करतील. कारण आम्ही ७१ वी ही स्पर्धा सर्वात नेत्रदीपक मिस वर्ल्ड फायनल म्हणून सादर करु,” असे मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा ज्युलिया मोर्ली यांनी यापूर्वी म्हटले होते.

१३० हून अधिक देशांतील स्पर्धकांचा सहभाग असलेल्या आणि महिनाभर चालणार्‍या या इव्हेंटमध्ये टॅलेंट, स्पोर्टस् आणि लोकहितासाठीचे उपक्रम अशी आव्हानात्मक स्पर्धा असेल. विद्यमान मिस वर्ल्ड पोलंडची कॅरोलिना बिएलॉस्का (Miss World 2022 Karolina Bielawska) सध्या भारत दौऱ्यावर आहे. ती या सौंदर्य स्पर्धेबद्दल जागृती करत ​​आहे. तिने म्हटले आहे की ती या “सुंदर देशात” मिस वर्ल्डचा मुकुट सोपवण्यास उत्सुक आहे. (Miss World 2023)

“संपूर्ण जगात उत्कृष्ट आदरातिथ्यासाठी भारताची ओळख आहे. येथे येण्याची माझी दुसरी वेळ आहे. येथे मला माझ्या घरासारखे वाटले. इथली विविधता, एकता, कौटुंबिक मुल्ये, आदर, प्रेम, दयाळूपणा या सर्व गोष्टी मला जगाला सांगायला आवडेल. इथे पाहण्यासारखे बरेच काही आहे आणि संपूर्ण जगाला एका महिन्यासाठी इथे आणणे आणि भारताने जे काही ऑफर करायचे आहे ते दाखवणे ही सर्वोत्तम कल्पना आहे,” असे मिस वर्ल्ड २०२२ ची विजेती कॅरोलिनाने यापूर्वी म्हटले होते.

भारत सहा वेळा मिस वर्ल्ड स्पर्धेचा विजेता

भारताने सहा वेळा प्रतिष्ठित मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली आहे. रीटा फारिया (१९६६), ऐश्वर्या राय (१९९४), डायना हेडन (१९९७), युक्ता मुखी (१९९९), प्रियांका चोप्रा (२०००) आणि मानुषी छिल्लर (२०१७) या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या विजेत्या आहेत.

 

 

Back to top button