Pakistan Shahid Latif killed
Pakistan Shahid Latif killed

Pakistan Shahid Latif killed: ‘जैश’च्या दहशतवाद्याची हत्या; मास्टरमाईंड शोधताना पाकिस्तानची मतीगुंग

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'जैश ए मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या शाहिद लतिफ (Pathankot attack Mastermind) आणि त्यांचा बॉडिगार्ड हाशिम अली काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात हत्या झाली. पोलिसांनी काही संशयितांना पकडले आहे, पण पोलिसांना या हत्येचे सूत्रधार काही सापडलेले नाहीत. या हत्येमागे बाह्यशक्तींचा हात असून, खुनाचा कट देशाबाहेर शिजला होता, असे पाकिस्तान पोलिसांनी म्हटले आहे. (Pakistan Shahid Latif killed)

लतिफ हा पठाणकोट हल्ल्यातील मास्टरमाईंड होता. लतिफ, त्याचा अंगरक्षक हाशिम आणि मशिदीतील मौलाना अहद पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील दस्का शहरात नमाज पठणासाठी गेले होते. त्या वेळी त्यांच्यावर गोळीबार झाला होता. यावेळी लतिफ आणि हाशिम जागेवरच ठार झाले, तर मौलाना अहद याचा रुग्णालयात मृत्यू झाला. (Pakistan Shahid Latif killed)

पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे पोलिस महानिरीक्षक डॉ. उस्मान अन्वर म्हणाले, "या हत्येमागे दुसऱ्या देशाचा हात आहे, आणि शत्रू राष्ट्राची गुप्तचर संस्था यात गुंतलेली आहे. गोळ्या झाडणारे तिघे सापडले आहेत. तसेच सियालकोट, लाहोर, कसूर अशा काही ठिकाणावरून गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना अटक केली आहे." (Pakistan Shahid Latif killed)

ते म्हणाले, "या हल्ल्याचे नियोजन पाकिस्तान बाहेर झाले. हल्लेखोर ६ आणि ९ ऑक्टोबरला पाकिस्तानात आले, आणि ११ ऑक्टोबरला हा हल्ला करण्यात आला. हे टार्गेट किलिंग होते." लतिफ याचे वय ५० होते आणि तो मुळचा पाकव्याप्त काश्मीरमधील होता. दस्का शहरातील नूर इ मदिना या मशिदाचा तो प्रशासक होता.

हेही वाचा:

logo
Pudhari News
pudhari.news