इस्रायल – हमास संघर्षात ७ दिवसांत ३२०० लोकांचा बळी | Israel Palestine War | पुढारी

इस्रायल - हमास संघर्षात ७ दिवसांत ३२०० लोकांचा बळी | Israel Palestine War

Israel Palestine War | गाझातून नागरिकांचे स्थलांतर सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्या संघर्षात आतापर्यंत ३२०० लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इस्रायलमधील १३०० आणि गाझामधील १९०० नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान इस्रायलने उत्तर गाझातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी निघून झाल्याचा इशारा दिल्यानंतर हजारो नागरिक दक्षिण गाझाकडे निघून जात आहेत. Israel Palestine War

इस्रायलच्या लष्कराने गाझामध्ये शुक्रवारी छापे टाकले, पण प्रत्यक्षात जमिनीवरील कारवाईबद्दल इस्रालयच्या लष्कराने खुलासा केलेला नाही. तर हमासने इस्राईलने दक्षिण गाझाकडे जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांवर हल्ले केल्याने ७० लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
दरम्यान मध्य-पूर्वेतील जॉर्डन, बहरीन या देशांत इस्रायलच्या गाझातील कारवाई विरोधात मोठी निदर्शने झाली, यात हजारो मुस्लिमांनी भाग घेतला. ही बातमी इंडिया टुडेने दिली आहे.

युरोपियन युनियनचे परराष्ट्र विभागाचे प्रमुख जोसप बोरेल यांनी फक्त २४ तासांत उत्तर गाझातील ११ लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवणे अशक्य असल्याचे सांगितले. “कल्पना करा आपण ११ लाख लोकांना चोवीस तासात दुसऱ्या ठिकाणी जायला सांगत आहतो. हे मानवी संकट आहे.” ही बातमी बीबीसीने दिली आहे. (Israel Palestine War)

“युरोपियन युनियनने इस्रायलला समर्थन दिले आहे. पण आम्ही आंतरराष्ट्रीय मानवी कायद्यांनाही बांधील आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे,” असे ते म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button