मोठी बातमी – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री इस्रायलमध्ये; ‘अस्तित्व असेपर्यंत तुमच्या पाठीशी’ | Antony Blinken meets Netanyahu | पुढारी

मोठी बातमी - अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री इस्रायलमध्ये; 'अस्तित्व असेपर्यंत तुमच्या पाठीशी' | Antony Blinken meets Netanyahu

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात कमालाची संघर्ष सुरू असतानाच अमेरिकेच परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी इस्रायलची राजधानी तेल अविवला भेट दिली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली, आणि अमेरिका पूर्णपणे इस्रायलच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली. (Antony Blinken meets Netanyahu)

इस्रायल आणि पॅलेस्टाईन या संघर्षात अमेरिका पहिल्यापासून इस्रायलच्या बाजूने आहे. सध्या इस्रायलमधील स्थिती कमालीची संवेदनशील असताना ब्लिंकेन यांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. (Antony Blinken meets Netanyahu)

ब्लिंकेन म्हणाले, “इस्रायल स्वतःचे संरक्षण करण्यासाठी समर्थ आहे. पण आम्ही सांगू इच्छितो अमेरिका जोपर्यंत अस्तित्वात आहे, तोपर्यंत अमेरिका इस्रायल सोबत आहे. इस्रायलला या संघर्षात आवश्यक ती सर्व मदत करण्याचा शब्द आम्ही दिला आहे. इस्रायला शस्त्रास्त्रे आणि इंटरसेप्टर पुरवले जातील. यातील पहिली मदत इस्रायलला पोहोचली आहे.”

ते म्हणाले, “हमासने जे कौर्य दाखवले ते धक्कादायक आहे. हे सर्व पचवन आणि समजून घेणे कठीण आहे. पण इस्रायलच्या नागरिकांनी दाखवलेले धैर्य आणि एकजूट अतुलनीय आहे.” फक्त अमेरिकेचा परराष्ट्रमंत्री म्हणून नव्हे तर एक ज्यू म्हणून मी येथे आलेलो आहे. माझे आजीने रशियातून पलायन केले होते, तर सावत्र वडिलांनी जर्मनीतील छळ पाहिला आहे. मी हे दुःख समजू शकतो.”

हेही वाचा

Back to top button