Israel-Hamas conflict
Israel-Hamas conflict

Israel-Hamas conflict: ‘हमास’ दहशतवाद्यांचे क्रूर कृत्य; आई-वडिलांसमोर मुलीची हत्या

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क: दहशतवादी संघटना हमासने शनिवारी  इस्रायलवर ५ हजार क्षेपणास्त्र डागले. यानंतर हमास आणि इस्रायलमध्ये संघर्षाचा पुन्‍हा एकदा भडका उडला आहे. दरम्यान हमास दहशतवाद्यांकडून इस्रायली नागरिक, महिला आणि लहान मुलांवर अत्याचार केले जात आहेत. सध्‍या एक व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्या व्हिडिओत आई, वडील आणि भावासमोर हमास दहशतवाद्यांनी मुलीला आई वडीलांसमोरच  तिची निर्घृण हत्या केल्‍याचे दिसत आहे. या क्रूरतेचा व्हिडिओ इस्रायल-पत्रकार इंडिया नफ्ताली यांनी 'X' वरून पोस्ट केला आहे. या संदर्भातील वृत्त 'एनडीटीव्ही'ने दिले आहे.  (Israel-Hamas conflict)

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये हमासचे सशस्त्र दहशतवादी एका इस्रायली कुटुंबाला ओलीस ठेवताना दिसत आहेत. तसेच या दहशतवाद्यांकडून कुटुंबासमोर मुलीची हत्या करण्यात आली आहे. हमासच्‍या दहशतवाद्यांनी १०० हून अधिक इस्रायलींना ओलीस ठेवले असल्याचे अमेरिकेतील इस्रायली दूतावासाने म्हटले आहे. (Israel-Hamas conflict)

Israel-Hamas conflict: व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

एक जोडपे आपल्या मुलगा आणि मुलीसोबत जमिनीवर बसलेले दिसत आहे. मुले अल्पवयीन असल्याचे दिसून येत आहे. मुलगा त्याच्या वडिलांना रडतरडतच विचारतोय की, बाबा तुमच्या हाताला रक्त का लागले आहे? तर एक मुलगी म्हणतेय- माझी बहिण जिवंत राहावी अशी माझी इच्छा होती; पण त्यांनी माझ्यासमोर तिची हत्या केली. दरम्यान, पालक मुलांचे सांत्वन करताना दिसत आहेत. त्यांना जमिनीवर झोपण्यास सांगितले जात आहे कारण हमासचे दहशतवादी त्यांच्या घराबाहेरही गोळीबार करत होते. हमास दहशतवादी खांद्यावर बंदूक असलेला व्यक्ती देखील या व्हिडिओत दिसत आहे.

हमासकडून क्रूरतेचा कळस

सोशल मीडियावरील अनेक ग्राफिक दृश्यांमध्ये जखमी इस्रायली सैनिक आणि नागरिकांना हात बांधून हमासच्या वाहनांमध्ये जबरदस्तीने बसवले जात असल्याचे दिसून आले. एका व्हिडिओमध्ये हमास गट ट्रकच्या मागे एका महिलेच्या मृतदेहाला लाथा मारताना दिसत आहे.

जगाला अशा घटना जाणून घेण्याची गरज

नफताली या व्हिडिओसोबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहितात, "हमासच्या दहशतवाद्यांनी एका इस्रायली कुटुंबाला ओलिस ठेवत असताना कॅमेऱ्यासमोर क्रूरपणे कृत्य करत असल्याचे दिसत आहे. तिच्या कुटूंबासमोरच फाशी देत एका मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यामुळे तिच्या भावंडांना धक्का बसला आहे. ही क्रूरता आहे. जगाला हे जाणून घेण्याची आणि अशा घटना थांबवण्याची गरज आहे, असेही तिने म्हटले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news