हो ची मिन्ह सिटी - तिरूचिरापल्ली आठवड्याला तीन विमाने उडणार

मुंबई : व्हिएतजेटने तिरूचिरापल्ली ते हो ची मिन्ह सिटी दरम्यान नवीन थेट उड्डाणमार्गाच्या माध्यमातून भारत व व्हिएतनामधील कनेक्टीव्हीटी वाढवली असून, ही विमानसेवा दर आठवड्याला भारत व व्हिएतनाम दरम्यान ३५ रिटर्न फ्लाइट्सची सुविधा देणार आहे.
आता व्हिएतजेटने हो ची मिन्ह सिटी आणि तिरूचिरापल्ली दरम्यान थेट फ्लाइट देखील सुरू केली आहे, २ नोव्हेंबर रोजी या सेवेला सुरुवात होत असून, सुरूवातीला दर आठवड्याला तीन रिटर्न फ्लाइट्सची असतील. दर सोमवार, बुधवार व शुक्रवार फ्लाइट्स तिरूचिरापल्लीवरून रात्री १२.३० वाजता उड्डाण घेतील आणि एचसीएमसी येथे सकाळी ७ वाजता उतरतील.
हेही वाचा :