कमोडवर शौचास बसताच लिंगाला डसला कोब्रा; हेलिकॉप्टरने हॉस्पिटलमध्ये नेताच डॉक्टरांनी.. | पुढारी

कमोडवर शौचास बसताच लिंगाला डसला कोब्रा; हेलिकॉप्टरने हॉस्पिटलमध्ये नेताच डॉक्टरांनी..

केपटाऊन; पुढारी ऑनलाईन

दक्षिण आफ्रिकेत जंगल सफारीदरम्यान एका परदेशी पर्यटकाच्या लिंगावर अत्यंत विषारी कोब्राने चावा घेतला. कोब्राचे विष इतके भयंकर होते की, उपचारासाठी हेलिकॉप्टरने नेऊनही पर्यटकाचे लिंग कापावे लागले. विषामुळे रुग्णाचे लिंग कुजल्याने ते कापण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेत दरवर्षी हजारो लोकांचा विषारी साप चावल्याने मृत्यू होतो.

नेदरलँडचा पर्यटक होता

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, नेदरलँडचा एक ४७ वर्षीय पर्यटक दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात फिरण्यासाठी आला होता. निसर्ग अभयारण्याला भेट देत असताना, पर्यटक जंगलाच्या मध्यभागी बांधलेल्या शौचालयाचा वापर करण्यासाठी गेला. यादरम्यान, कमोडमध्ये आधीपासूनच असलेल्या विषारी कोब्राने पर्यटकाच्या लिंगाला दंश केला. आरडाओरड केल्यानंतर जंगल सफारीचे रक्षक आणि इतर कर्मचारी मदतीसाठी धावले.

तीन तासांनंतर हेलिकॉप्टरने बचावकार्य

त्यांनी तातडीने नजीकच्या रुग्णालयाला हेलिकॉप्टरने पर्यटकाला नेणार असल्याचे सांगितेल. मात्र, यादरम्यान पर्यटकांना तीन तास वाट पाहावी लागली. घटनास्थळापासून जवळच्या रुग्णालयाचे अंतर 350 किमी होते. साप चावल्यानंतर, पर्यटकाला त्याच्या लिंगात जळजळ जाणवली, थोड्याच वेळात ते फुगले आणि संपूर्ण निळे पडले. हळूहळू त्या व्यक्तीच्या लिंगाचे आणि आजूबाजूच्या भागांचे मांस वितळू लागले.

संसर्ग पसरल्याने लिंग कापावे लागले

युरोलॉजी केस रिपोर्ट्समध्ये तज्ज्ञांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, एखाद्याच्या लिंगावर विषारी साप चावण्याची ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे. यापूर्वीही शरीराच्या मागील बाजूस साप चावल्याच्या घटना घडल्या आहेत. या पर्यटकाला दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात आपत्कालीन उपचार देण्यात आले, परंतु लिंगाच्या ऊतींचे विघटन होऊ नये आणि विष इतर भागांमध्ये पसरू नये म्हणून त्याचे लिंग कापण्यात आले.

नेदरलँडमधील डॉक्टरांनी लिंग पुन्हा तयार केले

नऊ दिवसांच्या उपचारानंतर डच नागरिकाला नेदरलँडला परत पाठवण्यात आले. जिथे डॉक्टरांनी गळालेल्या भागावर कमरेच्या भागातील ऊतींच्या सहाय्याने त्या व्यक्तीचे लिंग पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केला. या टिश्यूजच्या मदतीने डॉक्टरांनी पुरुषाच्या लिंगाची बरीच दुरुस्ती केली. तेव्हापासून, त्या व्यक्तीने आफ्रिकन देशांमध्ये प्रवास करणार्‍या लोकांना एका संदेशाद्वारे सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

साप चावल्याने ‘मांस खाण्याचे आजार’

सर्पदंशामुळे रुग्णाला नेक्रोसिस नावाचा आजार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याला सामान्यतः ‘मांस खाण्याचे आजार’ असे म्हणतात. यामध्ये त्वचेखालील ऊतींमध्ये जीवाणूजन्य संसर्ग होतो. यामुळे मृत्यूची शक्यताही खूप वाढते. हे जीवाणू प्रत्यक्षात मांस खात नाहीत, परंतु विषारी पदार्थ सोडतात, ज्यामुळे आसपासच्या ऊतींचे देखील नुकसान होते.

हे ही वाचलं का?

Back to top button