

पुढारी ऑनलाईन डेस्क : गॅरेनाने फ्री फायर इंडिया गेमची लॉन्चिंग तारीख पुढे ढकलली आहे. फ्री फायर गेम आजपासून (दि.५) उपलब्ध होणार होता. यामुळे फ्री फायर गेमचे चाहते उत्सुक झाले होते. मात्र, गेमची लॉन्चिंग तारीख पुढे ढकलल्यामुळे गेमचे चाहते निराश झाले आहेत. दरम्यान, गेमच्या नवीन लॉन्चिंग तारखेबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Free Fire India Updates)
फ्री फायर गेमचे इंडियन व्हर्जन आज (दि.५) लॉन्च होणार होते. यापूर्वी गॅरेनाने त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून गेम संदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी गेम लॉन्च करण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे म्हटले होते. गेमच्या रिलॉन्चिंगची घोषणा केल्यानंतर चाहत्यांनी दिलेला प्रतिसाद पाहून डेव्हलपर्सनी त्यांचे आभार मानले आहेत. (Free Fire India Updates)
"फ्री फायर इंडियाच्या चाहत्यांना गेमचा उत्तम अनुभव मिळावा. याची खात्री करण्यासाठी आम्ही लॉन्चिंग तारीख आणखी पुढे ढकलत आहोत. आम्ही गेम प्ले आणखी चांगले करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही गेमच्या चाहत्यांचे आभार मानतो. त्यांनी दिलेला प्रतिसाद अप्रतिम आहे. यापुढेही चाहत्यांकडून असाच प्रतिसाद मिळत राहील, अशी आम्ही अपेक्षा करतो. लवकरच तुमच्यासाठी अप्रतिम बॅटल रॉयलचा अनुभव घेऊन येणार आहोत", असे कंपनीने स्पष्ट केली आहे.
हेही वाचा :