Molnupiravir : इंग्लंडमध्ये कोरोनावरील ‘या’ गोळीला सशर्त मान्यता | पुढारी

Molnupiravir : इंग्लंडमध्ये कोरोनावरील 'या' गोळीला सशर्त मान्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडमध्ये कोरोना उपचाराकरीता महत्वाच्या आणि उपयुक्त समजल्या जाणाऱ्या अँटीव्हायरल (Molnupiravir) गोळीच्या सशर्त वापरास मान्यता देण्यात आली आहे. कोरोनावरील ही गोळी जगातील पहिली गोळी आहे. १८ वर्षांच्या पुढील लोकांना कोरोना संक्रमित लोकांना ही गोळी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांना ही गोळी दिवसांतून तीन वेळा घ्यावी लागणार आहे.

कोरोनावर गोळीद्वारे उपचार होऊ शकतात, हे ओळखणारा इंग्लंड हा पहिला देश आहे. या गोळीबद्दल असं सांगण्यात आलं आहे की, अँटीव्हायरल गोळी कोरोनाची लक्षणे कमी करते. रुग्णाला लवकर बरे होण्यास मदत करते. रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी आणि गरीब देशांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते. ही गोळी साथीच्या रोगाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन पद्धती, औषधोपचार आणि प्रतिबंध यासाठी उपयुक्त ठरेल”, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

इंग्लंडचे आरोग्य मंत्री साजिद जाविद म्हणतात की, “आमच्या देशासाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. इंग्लंड जगातील पहिला देश आहे ज्याने अशा अँटीव्हायरसला मान्यता दिली आहे ज्या घराच्या घरीच कोरोनावरील उपचार घेऊ शकतात.” अमेरिका, युरोप आणि इतर काही देशांतील संबंधित या औषधाचा आढावा घेत आहेत.

अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने मागील महिन्यात सांगितले की, ते गोळीची सुरक्षा आणि परिणामकारकता शोधण्यासाठी नोव्हेंबरच्या अखेरीस पॅनेलची बैठक बोलावण्यात येणार आहे. औषध निर्माता कंपनी ‘मर्क’ने हे औषध विकसित केले आहे. ऑक्टोबरमध्ये इंग्लंड अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते की त्यांनी ‘मोल्नुपिरावीर’चे (Molnupiravir) ४ लाख ८० हजार डोस मिळवले आहेत. या हिवाळ्यात आणखी हजारो लोकांवर उपचार करण्यात मदत होण्याची अपेक्षा त्यांना अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

पहा व्हिडिओ : अनंत अमुची ध्येयासक्ती : कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरने सर केले मनस्लू शिखर

Back to top button