भारताची चांद्रयान-३ मोहिम, पाकिस्तानचे माजी मंत्री म्हणाले, "हा तर..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेकडे ( Chandrayaan-3 Mission) संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. चांद्रयान-3 (Chandrayan 3) च्या लँडिंगसाठी काही तासांचा अवधी आहे. देशभरात या मोहिमेबद्दल कुतूहल आणि उत्कंठा आहे. आजचा दिवस भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. पाकिस्तानही या मोहिमेकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहे. यावर पाकिस्तानचे माजी माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Chandrayaan-3 Mission : …हा तर मानवजातीसाठी ऐतिहासिक क्षण
पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेबाबत ट्विटरवर म्हटलं आहे की, आज भारताचे चांद्रयान-३ चंद्रावर लँडिग करणार आहे. मी सर्व भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. कारण हा क्षण मानवजातीसाठी ऐतिहासिक असणार आहे.
पाकिस्तानने चंद्रावर लॅडिंगचे थेट प्रक्षेपण करावे
पाकिस्तानच्या माध्यमांनी बुधवारी सायंकाळी भारताच्या यानाचे चंद्रावरील लँडिगचे थेट प्रक्षेपण करावे, असे आवाहनही फवाद चौधरी यांनी केले आहे. भारताचे चांद्रयान ३ मोहिम मानव जातीसाठी खास करुन भारतातील प्रत्येक नागरिक, शास्त्रज्ञांसाठी ऐतिहासिक क्षण असणार आहे. भारतातील अंतराळ समुदायाचे खूप खूप अभिनंदन, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
Chandrayaan-3 Mission : संपूर्ण देशवासीयांचे लक्ष चांद्रयान-३ मोहिमेकडे
आज चांद्रयान-३ मोहिम फत्ते करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) सज्ज झाली आहे. सायंकाळी ६ वाजता चांद्रयान चंद्रावर अवतरणार आहे. या मोहिमकडे देशवासियांचे लक्ष वेधले आहे. देशभरात ही मोहित यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. या मोहिमेचे थेट प्रक्षेपण देशभरात होणार आहे. या कार्यक्रमासाठी शाळा खुल्या राहणार आहेत. अवकाशप्रेमी ऐतिहासिक क्षणाच्या अपेक्षेने पार्ट्यांचे आयोजन करत आहेत. ब्रिक्स परिषदेनिमित्त दक्षिण आफ्रिका दौर्यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन सहभागी होणार आहेत.
हेही वाचा :
- Chandrayaan-3 Mission | लँडिंगच्या आधी ‘इस्रो’ने शेअर केली चंद्राच्या दूरवरील भागाची छायाचित्रे
- Chandrayaan-3 : पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेतून पाहणार ‘चांद्रयान-3’ चे लाईव्ह लँडिंग
- Chandrayaan-3 : इतिहास घडविण्यासाठी ISRO सज्ज, जाणून घ्या आजवरच्या चांद्रमाेहिमांविषयी