पुढारी ऑनलाईन: उत्तर म्यानमारमधील जेड खाणीत भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ३० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. घटनास्थळी शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याची माहिती बचाव पथकातील अधिकाऱ्याने (Myanmar Mine Landslide) दिली आहे, असे वृत्त 'सीएनबीसी, टिव्ही १८' ने दिले आहे.
ही घटना म्यानमारच्या सर्वात मोठ्या शहर यंगूनच्या उत्तरेस ९५० किलोमीटर अंतरावर असलेल्या काचिन राज्यातील दुर्गम पर्वतीय शहर हपाकांत येथे घडली. जेड हे क्षेत्र जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात किफायतशीर खाणींचे केंद्र आहे. येथील बचाव पथकाच्या प्रमुखाने असोसिएटेड प्रेसला दिलेल्या माहितीत सांगितले की, रविवारी दुपारी साडेतीन वाजता मन्ना गावाजवळ भुस्खलन झाले. दरम्यान जेड खाणीत काम करणारे सुमारे ३० हून अधिक खाण कामगार (Myanmar Mine Landslide) खाणीत भुसख्खलन झाल्याने वाहून गेले.
मन्ना गावाजवळील अनेक खाणीतील माती आणि चिखल ३०४ मीटर (सुमारे १ हजार फूट) उंच कड्यावरून सरोवरात घसरली. यानंतर खाणीत काम करणारे ३० हून अधिक कामगार तलावातून वाहून गेले असल्याचेही या अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे. यापूर्वी जुलै २०२० मध्ये याच भागात झालेल्या भुस्खलन दुर्घटनेत १६२ लोक मरण पावले. तर नोव्हेंबर २०१५ मध्ये अशाचप्रकारे झालेल्या दुर्घटनेत ११३ लोकांचा मृत्यू झाला, असल्याचेदेखील (Myanmar Mine Landslide) सीएनबीसी (टिव्ही १८) ने दिलेल्या वृत्तात स्पष्ट केले आहे.