रशियाच्या गोळीबारात नवजात बालकासह ७ लोक ठार; युक्रेनचा दावा | पुढारी

रशियाच्या गोळीबारात नवजात बालकासह ७ लोक ठार; युक्रेनचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क :   युक्रेनच्या खेरसन भागात रविवारी (दि.१३) रशियन गोळीबारामुळे एका नवजात बाळासह सात जणांचा मृत्यू झाला असल्याचे सीएनएन या वृत्तसंस्थेने प्रादेशिक नेत्याचा हवाला देत वृत्त दिले आहे. खेरसन प्रदेश लष्करी प्रशासनाचे प्रमुख ओलेक्झांडर प्रोकुडिन यांनी सांगितले की, खेरसनमध्ये झालेल्या हल्ल्यात २३ दिवसांचे बाळ आणि तिचा १२ वर्षांचा भाऊ आणि त्यांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे. (Russia-Ukraine war)

Russia-Ukraine war : २३ दिवसांचे बाळासह ७ लोक ठार

माहितीनुसार, युक्रेनच्या खेरसन प्रदेश लष्करी प्रशासनाचे प्रमुख ओलेक्झांडर प्रोकुडिन यांनी सांगितले की, “आज खेरसन प्रदेश भयंकर बातमीने हादरला आहे. छोटी सोफिया फक्त 23 दिवसांची होती, तिचा भाऊ आर्टेम 12 वर्षांचा होता. आज त्यांना रशियाने त्यांच्या वडिलांसह आईलाही मारले आहे”ऑलेक्झांडर प्रोकुडिन यांनी सांगितले की, स्टॅनिस्लाव गावात झालेल्या हल्ल्यात एका ख्रिश्चन पाद्रीसह दोन लोक मारले गेले आहेत.

दरम्यान, गेल्या २४ तासांत खार्किवच्या कुपियान्स्क जिल्ह्यातून ३६ मुलांसह १११ जणांना बाहेर काढण्यात आले आहे, असे सीएनएनने खार्किव प्रदेश लष्करी प्रशासनाचे प्रमुख ओलेह सिनीहुबोव्ह यांच्या हवाल्याने सांगितले. ओलेह सिनेहुबोव्ह म्हणाले, “गेल्या २४ तासांत कुपियान्स्क जिल्ह्यातून एकशे अकरा लोकांना बाहेर काढण्यात आले आहे, ज्यात ३६ मुले आणि चार अपंग लोक आहेत,” असे खार्किव प्रदेश लष्करी प्रशासनाचे प्रमुख ओलेह सिनेहुबोव्ह यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button