Myanmar | आंग सान स्यू की यांचा वनवास संपला, म्यानमारच्या लष्करी राजवटीनं दिली माफी | पुढारी

Myanmar | आंग सान स्यू की यांचा वनवास संपला, म्यानमारच्या लष्करी राजवटीनं दिली माफी

यंगून, पुढारी ऑनलाईन : म्यानमारच्या (Myanmar)  नेत्या आंग सान स्यू की (Aung Suu Kyi) यांना माफी दिली असल्याचे वृत्त AFP वृत्तसंस्थेने दिले आहे. म्यानमारच्या सरकारी मीडियाने मंगळवारी ही माहिती दिली. म्यानमारमधील सत्तारुढ लष्करी राजवटीच्या सरकारने तुरुंगात असलेल्या आंग सान स्यू की यांना माफी देण्याची घोषणा केली आहे. सू की यांना १९ गुन्ह्यांत दोषी ठरवण्यात आले होते. त्यासाठी एकूण ३३ वर्षे शिक्षेची तरतूद आहे.

“राज्य प्रशासन परिषदेच्या अध्यक्षांनी आंग सान स्यू की यांना माफी दिली आहे. ज्यांना संबंधित न्यायालयांनी शिक्षा सुनावली होती,” असे सरकारी मीडियाने म्हटले आहे. २०२१ च्या लष्करी उठावादरम्यान पदच्युत केल्यापासून त्या नजरकैदेत आहेत.

म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की (Myanmar’s Aung San Suu Kyi) यांना निवडणूक घोटाळा (electoral fraud) प्रकरणात गेल्या वर्षी तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. लष्करी राजवट असलेल्या सरकारने चालवलेल्या खटल्यात इतर गुन्ह्यांसाठी त्या आधीच १७ वर्षाची शिक्षा भोगत आहेत.

म्यानमारमधील निवडणुकांमध्ये अफरातफर झाल्याचा दावा करत लष्कराने सत्ता आपल्या हातात घेतली होती. लष्कराच्या राजवटीनं सत्ता हातात घेतल्यानंतर म्यानमारमध्ये नेहमी निदर्शने सरु असतात. पण लष्कराने बळाचा वापर करत लोकांची आंदोलने चिरडून टाकली आहेत.

२०२० च्या सार्वत्रिक निवडणुकीत आंग सान स्यू की यांच्या पक्षाने मोठा विजय मिळवला होता. पण त्यानंतर लगेच सैन्याने सत्ता ताब्यात घेतली. त्यामुळे त्यांना सलग दुसऱ्यांदा पाच वर्षांच्या सत्ता कार्यकाळापासून दूर ठेवले. निवडणूक निरीक्षकांना कोणतीही मोठी अनियमितता आढळली नसली तरी या निवडणुकीत कथित फसवणूक झाल्यामुळे कारवाईची भूमिका घेतल्याचे लष्कराचे म्हणणे आहे.

वॉकी-टॉकी बेकायदेशीरपणे आयात करणे आणि बाळगणे, कोरोना व्हायरस निर्बंधांचे उल्लंघन करणे, देशद्रोह आणि भ्रष्टाचाराच्या पाच गुन्ह्यांमध्ये सू की यांना १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांच्या पक्षातील आणि सरकारमधील अनेक प्रमुख सदस्यांनाही तुरुंगात टाकण्यात आले होते.

आंग सान स्यू की ह्या नोबेल पारितोषिक विजेत्या आहेत. म्यानमारच्या अनेक दशकांच्या लष्करी राजवटीला त्यांनी विरोध केला होता. त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

 हे ही वाचा :

Back to top button